High alert in Delhi on Independence Day 2023 : देशात उद्या, स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मोठा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवादी संघटनांचा कट आहे, अशी माहिती उघड समोर आली आहे. देशातील विशेषतः दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणं, रेल्वे स्थानके लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटना १५ ऑगस्टला देशातील प्रसिद्ध संरक्षण संस्थांची कार्यालये, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणांना 'टार्गेट' करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांना दिलेल्या अहवालानुसार, प्रामुख्याने दिल्ली शहर या दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यादरम्यान दिल्लीत हल्ल्याचा प्लान असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरात सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. (Latest Marathi News)
यावर्षी फेब्रुवारीत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून दिल्ली आणि जवळपासच्या संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. एका अन्य रिपोर्टनुसार, मे मध्ये लश्कर ए तोयबाशी संबंधित एका पाकिस्तानातील म्होरक्याने सहकाऱ्यांना दिल्लीतील काही ठिकाणांची रेकी करण्याचे आदेश दिले होते. त्यात प्रमुख रस्ते, रेल्वे स्थानके, दिल्ली पोलिसांची प्रमुख कार्यालये आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयाचा समावेश होता.
गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, मे २०२३ मध्ये एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. पाकव्याप्त भागातील हा व्हिडिओ होता. जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये हल्ला करण्याची शक्यता आहे, असा इशारा त्या व्हिडिओतून दिला होता. दिल्लीत स्वातंत्रदिनी होणाऱ्या कार्यक्रमात हल्ला घडवून आणण्याची दाट शक्यता आहे, असेही सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. गस्त आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. लाल किल्ला परिसरात हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यासह कॅमेरे, अँटी ड्रोन सिस्टमच्या माध्यमातून सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.