अखेर पाकिस्तानी पंतप्रधान नमले; 'त्या' 800 कट्टरपंथींची सुटका होणार

पाकिस्तानमध्ये इम्रान सरकारने बंदी घातलेली कट्टरपंथी संघटना तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) पुढे सरकार नतमस्तक होण्याची चिन्हे आहेत.
अखेर पाकिस्तानी पंतप्रधान नमले; 'त्या' 800 कट्टरपंथींची सुटका होणार
अखेर पाकिस्तानी पंतप्रधान नमले; 'त्या' 800 कट्टरपंथींची सुटका होणारSaam TV
Published On

पाकिस्तानमध्ये इम्रान सरकारने बंदी घातलेली कट्टरपंथी संघटना तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) पुढे सरकार नतमस्तक होण्याची चिन्हे आहेत. सरकार लवकरच TLP वरील बंदी उठवणार असून त्यांना राजकीय पक्षाचा दर्जा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे टीएलपीला निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळणार आहे. एवढेच नाही तर सरकार लवकरच 800 हून अधिक TLP कार्यकर्त्यांची तुरुंगातून सुटका करणार आहे. या कार्यकर्त्यांना हिंसक घटनांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती.

अखेर पाकिस्तानी पंतप्रधान नमले; 'त्या' 800 कट्टरपंथींची सुटका होणार
Periods दरम्यान सेक्स योग्य?, पार्टनर गर्भवती राहू शकते?; तज्ञ म्हणातात...

साद रिझवीसह आठशे कट्टरपंथीयांची सुटका होणार

अलीकडेच, इम्रान सरकारने इस्लामाबादचा मोर्चा रोखण्यासाठी टीएलपीसोबत गोपनीय करार केला होता. करार जाहीर झाला पण त्याचा मसुदा सार्वजनिक केला गेला नाही. कराराचा मसुदा लीक झाल्याचा दावा पाकिस्तानच्या माध्यमांनी केला आहे. करारानुसार टीएलपीवरील बंदी लवकरच हटवली जाईल आणि पुढील सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा अधिकारही मिळेल, असे सांगण्यात आले आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती कामाला लागली आहे.

विरोधक म्हणाले, सरकारने कट्टरतावाद्यां समोर शरणागती पत्करली

विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ने हा करार सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. सरकारने कट्टरपंथी संघटनेला शरण आल्याचे म्हटले आहे. TLP प्रमुख साद रिझवी यांची तुरुंगातून सुटका आणि फ्रान्सच्या राजदूताला देशातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी TLP ने दहा दिवसांपूर्वी लाहोरजवळील GT रोड येथे धरणे आंदोलन केले होते. यानंतर 27 ऑक्टोबर रोजी पोलीस आणि TLP यांच्यात हिंसक संघर्ष झाला.

या संपूर्ण आंदोलनात आठ पोलिसांसह 19 जणांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यानंतर हजारो टीएलपी समर्थकांनी इस्लामाबादमध्ये मोर्चा काढला. त्याला रोखण्यासाठी इम्रान सरकारने मुस्लिम विद्वानांच्या माध्यमातून टीएलपीशी गुप्त करार केला होता. या अंतर्गत टीएलपी प्रमुख साद रिझवी आणि आठशे कार्यकर्त्यांची लवकरच तुरुंगातून सुटका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com