Periods दरम्यान सेक्स योग्य?, पार्टनर गर्भवती राहू शकते?; तज्ञ म्हणातात...

बहुतेक वेळा मासिक पाळी कपलच्या लैंगिक जीवनावर परिणाम करते.
Periods दरम्यान सेक्स योग्य?, पार्टनर गर्भवती राहू शकते?; तज्ञ म्हणातात...
Periods दरम्यान सेक्स योग्य?, पार्टनर गर्भवती राहू शकते?; तज्ञ म्हणातात... Saam Tv

मासिक पाळी दरम्यान सेक्स करू शकतो का? किंवा मासिक पाळी दरम्यान तुमची पार्टनर गर्भवती राहू शकते का? असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील. बहुतेक वेळा मासिक पाळी कपलच्या लैंगिक जीवनावर परिणाम करते. कारण मासिक पाळी दरम्यान अनेकदा त्यांच्यात समस्या सुरू होतात. पण, हे अजिबात खरे नाही आणि तसे नसावे. पीरियड्स दरम्यान सेक्स करण्यात काहीच गैर नाही. पण काय करावं आपल्या भारतीय समाजात मासिक पाळीबाबत अनेक गृहितकं आहेत.

मासिक पाळीशा संबंधीत अनेक प्रश्न कपलच्या मनात येत असतात त्याने ते परेशान देखील असतात. उदाहरणार्थ, आरोग्याच्या दृष्टीकोनातून या कालावधीत सेक्स चांगला आहे की नाही, त्याचे फायदे काय आहेत किंवा केले तर त्यात काही नुकसान आहे का?. जर तुमच्याही मनात सेक्सशी संबंधित असे प्रश्न येत असतील तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मासिक पाळी दरम्यान सेक्सचा अनुभव घेणे योग्य की अयोग्य!

Periods दरम्यान सेक्स योग्य?, पार्टनर गर्भवती राहू शकते?; तज्ञ म्हणातात...
पुरुषांनो सावधान! वायू प्रदूषणाचा 'शुक्राणू'वर होतो भयंकर परिणाम

मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा का?

कपलच्या मनात पहिला प्रश्न हा येतो का मासिक पाळी दरम्यान सेक्स करता येईल का? बहुतेक लोकांसाठी याचं उत्तर होय आहे. फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्राच्या प्राध्यापक लॉरेन स्ट्रायचर, सांगतात की लोक याबद्दल काळजी करतात, परंतु ते पूर्णपणे ठीक आहे. वैद्यकीय दृष्टीकोनातून, मासिक पाळी दरम्यान सेक्स करण्यात काहीच गैर नाही. परंतु ज्या लोकांना हिपॅटायटीस STI, किंवा HIV आहे, त्यांना या काळात रक्तामुळे रोग पसरण्याचा धोका वाढतो. त्या सांगतात की मासिक पाळीत येणारे रक्त हे नियमित रक्तापेक्षा वेगळे असते. मात्र, या काळात अजूनही रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

मासिक पाळी दरम्यान पार्टनर गर्भवती राहू शकते?

होय, या काळात तुमची पार्टनर गर्भवती राहू शकते. पण सहसा असे होत नाही. तथापि, जर तुम्ही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचा विचार केला तर, गर्भवती होण्याची आणि STI होण्याची संभावणा आहे. म्हणून, या काळात प्रोटेक्शन वापरणे आवश्यक आहे.

Periods दरम्यान सेक्स योग्य?, पार्टनर गर्भवती राहू शकते?; तज्ञ म्हणातात...
'शारिरीक संबंधा'विषयी गुगलवर सर्वाधीक सर्च होणारे '6 प्रश्न'

मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्याचे फायदे

महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान सेक्सचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही या काळात सेक्स करत असाल तर तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. यावर स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की पीरियड्स क्रॅम्प्स हे गर्भाशयाच्या आकुंचनामुळे होते आणि जेव्हा ऑर्गॅझम होतो तेव्हा त्याच्या ट्रिगरसह एंडोर्फिन सोडले जातात. आणि हे एंडॉर्फिन शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात.

मासिक पाळी दरम्यान सेक्स करण्याते तोटे

जसे आपण जाणतो की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रमाणे मासिक पाळी दरम्यान सेक्सचे देखील फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. पीरियड सेक्स दरम्यान तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला रक्त लागू शकते. कारण असे होऊ शकते की तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला ते आवडणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com