जेव्हा लैंगिक शिक्षण किंवा या विषयाची माहिती सामायिक करण्याचा विचार येतो, तेव्हा आधुनिक युगातही लोक या विषयावर मोठ्या संकोचाने बोलतात. यामुळेच बहुतांश लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून लैंगिक गोष्टींशी संबंधित माहिती मिळवण्यात रस असतो. लोकांना कसलीही अडचण आली तरी ते लगेच गुगल करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लोक गुगलवर सेक्सबद्दल कोणते प्रश्न सर्वात जास्त सर्च करतात? चला तर मग जाणून घेवूयात प्रश्न आणि त्यांची उत्तर.
शारिरीक संबंधांदरम्यान एवढा आनंद का मिळतो?
यामध्ये सर्वात मोठे योगदान आहे स्पर्शाचे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने स्पर्श केला तेव्हा त्याला मानसिक आराम वाटतो. शारिरीक संबंधांदरम्यान आणि नंतर शरीरात सोडले जाणारे डोपामाइन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन्स शरिराला आनंद देतात. यामुळेच माणसाला शारिरीक संबंध ठेवण्याची जास्त इच्छा होते.
ऑर्गॅज्म कसे करायचे?
बोटांच्या कामातून ऑर्गॅज्मची करता येते. जोडप्याने ऑर्गॅज्म केल्याने शारिरीक संबंधांमधील आनंद द्विगूणीत होतो. त्यांनंतर शारिरीक संबंध ठेवल्याने शारिरीक संबंधांमध्ये आनंद जास्त मिळतो.
शारिरीक संबंधांबाबत स्वप्ने पाहणे सामान्य आहे का?
होय, हे अगदी सामान्य आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून शारिरीत संबंध इच्छा असते, तेव्हा त्याचा परिणाम त्याला स्वप्नातही दिसून येतो. आपले मनोवैज्ञानिक मन फक्त तीच स्वप्ने दाखवते ज्याची आपल्याला तीव्र इच्छा असते किंवा जी आपल्या मनात सर्वात जास्त चालू असते.
शारिरीक संबंधाची वेळ कशी वाढवायची?
ज्या पुरुषांना लवकर स्खलन होण्याच्या समस्येने ग्रासले आहे, ते हा प्रश्न गुगलवरती जास्त प्रमाणात सर्च करतात. डॉक्टरही काही सल्ला गुगलवरती देतात आणि नेमकं हेच लोक सर्च करत असतात. शारिरीक संबंधाची वेळ वाढल्यामुळे, व्यक्ती आणि त्याच्या जोडीदाराचे लैंगिक जीवन सुखी होते.
किती वेळा शारिरीक संबंध ठेवावा?
जोडप्याने किती वेळा शारिरीक संबध ठेवावे याबाबत गुगलवरती मोठ्या प्रमाणात सर्च केले जाते. याचं उत्तर त्यांना असे मिळते ते म्हणजे सेक्स किती वेळा करावा हे जोडप्याचे प्रेम,आणि इच्छा यावर अवलंबून असते. काही लोक दिवसातून एकदा, काही दोन ते तीन किंवा अधिक वेळा या क्रियाकलापाचा आनंद घेतात. किती वेळा सेक्स करायचा, हा निर्णय फक्त आणि फक्त जोडपेच घेऊ शकतात.
शारिरीक संबंधांदरम्यान का दुखते?
जर तुम्ही पहिल्यांदाच शारिरीक संबंध ठेवणार असाल, तर तुम्हाला नक्कीच वेदना जाणवतील. पहिल्यांदा शारिरीक संबंध ठेवताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिेजे याबाबत अनेक तज्ञ लोकांनी आप आपली मते गुगलवरती नोंदवली आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.