Pakistan : पेट्रोल २५८ रुपये, डिझेल २६२ रुपये प्रतिलिटर; युद्धाचा भडका, पाकिस्तान महागाईनं होरपळला!

Pakistan New : पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ जाहीर केली आहे. ३१ मे २०२५ रोजी पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा दरवाढ केल्याने पाकिस्तानमधील लोक वैतागले आहेत.
pakistan
pakistanx
Published On

पाकिस्तानच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. आजपासून (१६ जून) पुढील १५ दिवसांसाठी ही दरवाढ लागू राहणार आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ४.८० रुपयांची, तर हाय स्पीड डिझेलच्या किमतीत प्रति लीटर ७.९५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

pakistan
Team India : इंग्लंडमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का! मालिका सुरु होण्याआधीच दुखापतीमुळे दोन खेळाडू संघातून बाहेर

पाकिस्तान सरकारने केलेल्या नव्या दरवाढीनंतर, हाय स्पीड डिझेलची किंमत प्रति लीटर २६२.५९ रुपये झाली आहे. पेट्रोलची किंमत आता प्रति लीटर २५८.४३ रुपये प्रति लीटर अशी राहणार आहे. पेट्रोल उत्पादनांच्या सुधारित किमतींच्या संबंधित अधिकृत अधिसूचना पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे.

याआधी ३१ मे २०२५ रोजी पाकिस्तानच्या केंद्र सरकारने पेट्रोलच्या किमतीत प्रति लीटर एका रुपयांची वाढ केली होती. त्यावेळी पेट्रोलची किंमत २५३.६३ रुपये प्रति लीटर किंमत निश्चित करण्यात आली होती. आता पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती लागू करण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्य जनता आणि उद्योगांवर ताण येणार असल्याचे म्हटले जात आहे.

pakistan
Ahmedabad Plane Crash : विमान खाली कोसळले अन् आग भडकली, विमान अपघातात कसा वाचला विश्वास कुमार रमेश? पाहा नवा थरारक व्हिडीओ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा थेट परिणाम पाकिस्तानमधील वाहतूक, शेती आणि अन्य औद्योगिक क्षेत्रांवर होणार असल्याचे म्हटले जात आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे इतर वस्तू आणि सेवांच्या किंमती देखील वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक दबाव आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

pakistan
Air India : एसी बंद झाला, लहान मुलं रडायला लागली; विमान टेकऑफ होण्याआधी नेमकं काय झालं? पाहा व्हायरल व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com