Pakistan Bus Attack: पाकिस्तानात बसवर हल्ला; ओळखपत्रे पाहून ९ प्रवाशांचे अपहरण करत झाडल्या गोळ्या

Bus Attack: बंदूकधाऱ्यांनी तफ्तानला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्याचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली.
Pakistan Bus Attack
Pakistan Bus AttackDawn/Nokshi police

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी पहाटे बलुचिस्तानच्या नोश्कीजवळ बंदूकधाऱ्यांनी ९ जणांची हत्या करण्यात आलीय. बंदूकधाऱ्यांनी त्यांना बसमधून उतरवून त्यांची हत्या केल्याचे माहिती समोर आलीय. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एका वाहनावरही हल्ला करण्यात आला, त्यात एक जण ठार झाला आणि ४ जण जखमी झालेत.(Latest News)

डॉन डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, नोश्कीजवळील सुलतान चरहाईच्या आसपास सुमारे १०-१२ बंदूकधाऱ्यांनी क्वेटा-तफ्तान महामार्ग एन- ४० ब्लॉक केला. यानंतर बसमधून ९ प्रवाशांचे अपहरण करण्यात आलं. बंदूकधाऱ्यांनी तफ्तानला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्याचे अपहरण करत त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती उपायुक्त हबीबुल्ला मुसाखेल यांनी दिली.

अपहरण केलेल्या प्रवाशांचे मृतदेह जवळच्या पुलाखाली सापडले आहेत. बसमधील नागरिकांची लूट झाली का नाही याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये. दरम्यान ज्या लोकांची हत्या करण्यात आली ते सर्वजण पंजाबचे होते, अशी माहिती नोश्की स्टेशन हाऊस ऑफिसर असद मेंगल यांनी दिलीय.

दरम्यान, बलुच बंडखोरांनी यापूर्वी या प्रदेशात अशाच प्रकारच्या हत्या घडवून आणल्यात आणि त्याची जबाबदारी स्वीकारलीय. या भागात ग्वादर सागरी बंदर चीनकडून विकसित केले जात आहे. या बलुच बंडखोरांनी चिनी नागरिक आणि त्यांच्या हितसंबंधांनाही नेहमी टार्गेट केलंय. चीनने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत ६५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com