Crime in pakistan
Crime in pakistan Saam tv

Pakistan Crime : धक्कादायक! बापासमोर भावाने केली बहिणीची हत्या, परिसरात खळबळ

Pakistan Crime news in marathi : पाकिस्तानातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बापाच्या समोर भावाने बहिणीची हत्या केली आहे.

Pakistan Honour Killing :

पाकिस्तानातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बापाच्या समोर भावाने बहिणीची हत्या केली आहे. तर आरोपीचा दुसरा भाऊ ही घटना मोबाईल कॅमेरात कैद करत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

बापासमोर भावाकडून बहिणीची हत्या

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या पंजाबमध्ये टोबा टेक सिंह क्षेत्रातील ही घटना आहे. मारिया बीबी असं मृत तरुणीचं नाव आहे. ती २२ वर्षांची होती. मारिया बीबीची तिच्या भावानेच हत्या केली. आरोपी भावाने मारियाचा गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेवेळी तिचा बाप बाजूला होता तर दुसरा भाऊ मोबाईलमध्ये घटना कैद करत होता.

Crime in pakistan
Crime News: पहाडी पोपटांची बेकायदेशीर विक्री, वन विभागाने सापळा रचून केली तिघांना अटक

घटनेचा व्हिडिओ दाखवू शकत नाही

तुम्हाला घटनेचा व्हिडिओ दाखवू शकत नाही. बहिणीच्या हत्या केल्यानं आरोपीने त्याच्या बापाला प्यायला पाणी देखील दिलं. व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांवर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.

गुन्हा पोलिसांत नोंद

मीडिया रिपोर्टनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिासांनी आरोपी आणि त्याच्या बापाला अटक केली आहे. तसेच व्हिडिओ काढणाऱ्या भावालाही अटक केली आहे.

Crime in pakistan
Sindhudurg Crime News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 30 लाखाची दारू जप्त, वाहन चालक फरार

तत्पूर्वी, पाकिस्तानमध्ये महिलांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराच्या घटनेत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी चिकन न बनवल्याने सासरच्या मंडळींनी सूनेला खिडकीतून फेकून दिलं होतं. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओत महिला इमारतीवरून थेट रस्त्यावर पडताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com