
पाकिस्तानी सैन्यानं आपल्या देशातच एअर स्ट्राईक केलं.
३० हून अधिक मुलांसह नागरिकांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात चीनी बॉम्बचा वापर झाला.
भारतानं सिंदूर ऑपरेशन राबवून पािकस्तानात घूसुन दहशतवादी मारले तर पाक सैन्यानं मात्र पाकिस्तानातच चीनी बॉम्ब वापरून निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. होय तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय. पाकचं सैन्यचं आपल्याच नागरिकांच्या जिवावर उठलंय. बॉम्ब डागत केलेल्या या लष्करी कारवाईत 30 पेक्षा अधिक मुलाबाळांचा मृत्यू झालाय. तर शेकडो नागरिक जखमी आहेत. पाहा गोंधळेल्या पाकनं काय केलंय.
पाक सैन्याची मध्यरात्री खैबर पख्तूनख्वामध्ये लष्करी कारवाई
चीनी जे-17 फायटरमधून नागरी वस्तीवर डागले बॉम्ब
बॉम्बस्फोटात 30 लोकांचा मृत्यू, महिला - मुलांचा समावेश
पाकिस्तान आर्मीकडून मौन, जगभरात कारवाईचा निषेध
अफगनिस्तानजवळ असलेल्या या प्रांतात तहरिक ए तालिबान या संघटनेचे दहशतवादी असल्याचं म्हणत पाकनं हे ऑपरेशन राबवलं. मात्र दहशतवादी सोडून निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानं पाकिस्तानात आपल्याच लष्कराविरोधात संताप आहे. या कारवाईवर सवाल उपस्थित होतायेत कारण हा भाग इम्रान खानचा बालेकिल्ला असून मुद्दामहून इथल्या नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप होतोय.
पाकिस्तानं आपल्याच लोकांचा जीव घेऊन स्व:ताची नाचक्की करुन घेतलीये. त्यामुळे आता आंतराष्ट्रीय लवादानं आणि आंतराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या प्रकाराची दखल घेऊन लोकांचे जीव वाचवावे अशी मागणी जोर धरतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.