Pakistan Afghanistan War: पाक-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, पाकचे 58 सैनिक ठार,

Afghan Attack On Pakistan: पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आता अफगाणनंही पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलयं... या हल्ल्यात पाकचे 58 सैनिक ठार झालेत... मात्र पाक- अफगाणिस्तान युद्ध होण्यामागे नेमकी कारणं काय? अफगाणी परराष्ट्र मंत्री नेमकं काय म्हणाले ?
Afghan soldiers launch heavy attacks on Pakistani border posts near Durand Line — visuals show intense clashes and destruction of military outposts.
Afghan soldiers launch heavy attacks on Pakistani border posts near Durand Line — visuals show intense clashes and destruction of military outposts.Saam Tv
Published On

अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या काबुलवरील हवाई हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानी चौक्यांवर केलेल्या हल्ल्याची ही भयानक दृश्य...

पाकिस्तानच्या नंगरहार आणि कुनार प्रांतात अफगाणी सैनिकांनी पाकिस्तानी सैन्य चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला. अफगाण सैन्याने 'ड्युरंड लाईन' जवळील अनेक पाकिस्तानी चौक्यांवर ताबा मिळवला आणि त्यांच्या लष्करी सुविधा उद्ध्वस्त केल्यात.. तर अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी भारतामधून पाकिस्तानला कडक शब्दांत इशाराही दिलाय...

तर दुसरीकडे तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केलाय...

अफगाणिस्तानच्या कारवाईत 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तर 30 पाक सैनिक जखमी आहेत..तर 9 तालिबानी सैनिकांचे बळी गेल्यानं कतार आणि सौदी अरेबियाच्या आदेशावरून कारवाई थांबवण्यात आल्याचा दावा अफगाणिस्ताननं केलाय. पाकिस्तानने आयएसआयएसला त्यांच्या वायव्य प्रांतातल्या खैबर पख्तुनख्वामध्ये कॅम्प उभारण्यास परवानगी दिलीय. त्यामुळे पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवावं आणि दहशतवाद्यांना अफगाणिस्तान स्वाधीन करावं.

दरम्यान अफगाणिस्तानच्या संरक्षण विभागानं पाकिस्तानच्या 7 सैनिकांना ओलीस ठेवल्याचा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर शेअर केलाय... त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांधील संघर्ष अधीक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता पाकिस्तान आपल्या सात सैनिकांना सोडवण्यासाठी काय रणनीती आखतो याकडे जगाचं लक्ष लागलयं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com