Pakistan News: ऐकावं ते नवलंच! २७ वर्षीय महिलेने एकाचवेळी दिला ६ जन्म; डॉक्टरही चक्रावले

Pakistan News : पाकिस्तानातील रावळपिंडीत एक विचित्र घटना घडलीय. एका २७ वर्षीय महिलेने एकाचवेळी ६ मुलांना जन्म दिलाय. विशेष म्हणजे आईसह सर्व नवजात बाळांची तब्येत व्यवस्थित आहे.
Pakistan woman Give Birth To 6 Babies
Pakistan woman Give Birth To 6 Babiesnewsweek

इस्लामाबाद : Pakistan woman Give Birth To 6 Babies :

पाकिस्तानातील रावळपिंडी येथे एका २७ वर्षीय महिलेने एकाचवेळी ६ मुलांना जन्म दिलाय. रावळपिंडीच्या जिल्हा रुग्णालयात या महिलेने शुक्रवारी सेक्सटुप्लेट्सला म्हणजेच षष्ठाळेंना जन्म दिलाय. या घटनेमुळे वैदयकीय जगात एकच चर्चा रंगलीय. पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉननुसार, हजारा कॉलोनीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद वहीद यांच्या पत्नी झीनत वहीद ही गर्भवती होती. त्यांना गुरुवारी प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या होत्या त्यानंतर त्यांना गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर शुक्रवारी झीनतने तासाभरात एकामागून एक ६ मुलांना जन्म दिला.

जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर फरझान म्हणाले की, सहा बाळांपैकी ४ मुले आणि २ मुली असल्याचं सांगितले. सर्व चहा मुलांचे वजन जोन पाउंडपेक्षा कमी आहे. परंतु नवजात शिशू आणि आई यासर्वांचे आरोग्य सध्या ठीक आहे. डॉक्टरांनी बाळांना इनक्युबेटरमध्ये ठेवलंय, पण त्यांच्या जीवाला कोणताच धोका नाहीये. झीनतची ही पहिलीच प्रसूती होती. सर्व मुले आणि त्यांची आई निरोगी असून डॉक्टर त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

हॉस्पिटलच्या लेबर रुमच्या ड्युटी ऑफिसरने सांगितले की, ही नॉर्मल डिलिव्हरी नव्हती. झीनत यांच्या प्रसूतीचा क्रम तिसऱ्या क्रमांकावर होता. प्रसूतीतील गुंतागुंत पाहून डॉ. फरझान यांनी ऑपरेशनसाठी एका तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली होती, त्या टीमने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

डॉ. फरझान यांनी सांगितले की, मुलांना जन्म दिल्यानंतर झीनतला आरोग्याशी संबंधित काही समस्या होत्या. मात्र त्या फारशा गंभीर नव्हत्या. येत्या काही दिवसांत त्यांची प्रकृती सामान्य होईल. देवाने आई आणि मुलांचे प्राण वाचवल्याने डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी आनंदी असल्याचं लेबर रुमच्या ड्युटी ऑफिसर म्हणाले. एकाच वेळी सहा मुलांचा जन्म होणे ही सामान्य घटना नाहीये, परंतु अलीकडच्या काळात प्रजननक्षमतेच्या औषधे घेण्याचे प्रमाण वाढल्याने अशा शक्यता वाढल्यात. रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वाहिद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सर्वजण खूश आहेत.

Pakistan woman Give Birth To 6 Babies
CAA Act : भारताने आतापर्यंत पाकिस्तान, बांगलादेशातील किती लोकांना दिलं नागरिकत्व? समोर आली मोठी आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com