Scientist Dead : खळबळजनक! पद्मश्री सायंटिस्टचा मृतदेह कावेरी नदीत आढळला, ३ दिवसापासून होते बेपत्ता

scientist Subbanna Ayyappan Death News : पद्मश्री वैज्ञानिक सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ते तीन दिवसांपासून बेपत्ता होते. पोलीस तपास सुरू.
Padma Shri Scientist Subbanna Ayyappan Found Dead
Padma Shri Scientist Subbanna Ayyappan Found DeadGoogle
Published On

Padma Shri Scientist Subbanna Ayyappan Found Dead : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रख्यात वैज्ञानिक सुब्बन्ना अय्यप्पन (वय ७०) यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला आहे. ७ मे २०२५ पासून ते अचानक बेपत्ता झाले होते. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला होता. शनिवारी (१० मे २०२५) रात्री त्यांचा मृतदेह कावेरी नदीत सापडला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, अय्यप्पन यांची हत्या झाली की आत्महत्या केली, याचा तपास सुरू आहे. अय्यप यांचा मृतदेह आढळल्यानंतर कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वैज्ञानिक सुब्बन्ना अय्यप्पन यांचे यांचे संशयास्पद परिस्थितीत निधन झाले आहे. शनिवारी त्यांचा मृतदेह कावेरी नदीजवळ श्रीरंगपट्टणा, मंड्या येथे आढळला. स्थानिकांनी नदीत एक मृतदेह तरंगताना आढळला होता. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळावर जात मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अय्यपन यांचा मृतदेह आढळल्यानंतर कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मांड्याचे एसपी मल्लिकार्जुन बालदंडी यांनी सांगितले की, अय्यप्पन यांची स्कूटर नदीजवळ आढळली. परंतु प्राथमिक तपासात कोणत्याही षडयंत्राचा अथवा हत्येचा पुरावा मिळालेला नाही. तपास सुरू आहे.

Padma Shri Scientist Subbanna Ayyappan Found Dead
Ceasefire Breach : पाकचे शेपूट वाकडे, ३ तासांत शस्त्रसंधीचं उल्लंघन, सडेतोड उत्तर देण्याचे लष्कराला आदेश

तीन दिवसापूर्वी बेपत्ता -

अय्यपन ७ मेपासून बेपत्ता होते. ८ मे रोजी म्हैसूर येथील विद्यारण्यपुरम पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. पण शनिवारी ते मृत अवस्थेत आढळले. अय्यपन यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू -

पोलिस आयुक्त सीमा लाटकर यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अय्यप्पन यांची शेवटची लोकेशन श्रीरंगपट्टणामध्ये आढळली होती. त्यांना ध्यानधारणेत आवड होती, आणि ते स्कूटरवरून तिकडे गेले होते. सुब्बन्ना अय्यप्पन हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) माजी महासंचालक होते आणि कृषी व मत्स्यपालन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी २०१० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Padma Shri Scientist Subbanna Ayyappan Found Dead
China Pakistan : चीनला पाकिस्तान पुळका, भारताविरोधात ड्रगनचा पाकड्यांना पाठिंबा|VIDEO

दिल्ली ते मुंबईपर्यंत काम

भारताच्या कृषी क्षेतासाठी अय्यपन यांनी मोठं योगदान दिलेय. अय्यप्पन यांनी दिल्ली, मुंबई, भोपाल, बर्राकपुर, भुवनेश्वर आणि बंगळुरूमध्ये कृषी विज्ञान क्षेत्रात मोठं योगदान दिलेय. सुब्बन्ना अय्यप्पन यांचे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक म्हणून नेतृत्व करणे ही एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आहे. ते पहिले गैर-कृषी वैज्ञानिक होते ज्यांनी या प्रतिष्ठित संस्थेची जबाबदारी सांभाळली. अय्यपन यांचे प्राथमिक संशोधन मत्स्यविज्ञान (Fisheries Science) क्षेत्रात होते. त्यांनी मत्स्यपालन व सागरी संशोधनात उल्लेखनीय योगदान दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com