Opposition Party Meeting: 'गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ देऊ नका'; काश्मीरच्या मेहबुबा मुफ्तींचा पाटण्यातून हल्लाबोल

mehbooba mufti: काश्मीरच्या मेहबुबा मुफ्ती यांनी पाटण्यातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
Opposition Party Meeting
Opposition Party MeetingSaam tv
Published On

Opposition Party Meeting News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १७ विरोधी पक्षातील नेत्यांची महत्वाची बैठक पाटण्यात पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विविध विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. या बैठकीत मेहबुबा मुफ्ती यांनीही मोदी सरकार सडकून टीका केली. 'गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ देऊ नका, असा हल्लाबोल काश्मीरच्या मेहबुबा मुफ्ती यांनी पाटण्यातून केला. (Latest marathi News)

या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , उद्धव ठाकरे , ममता बॅनर्जी , अरविंद केजरीवाल , भगवंत मान, एमके स्टॅलिन यांच्यासह सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह पाच राज्यांचे माजी मुख्यमंत्री सहभागी झाले होते. या बैठकीला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते.

Opposition Party Meeting
Patna Opposition Unity Meeting: 'आमच्यात थोडे मतभेद आहेत, पण..' विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

या पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, 'आमच्या सोबत जम्मू-काश्मीरमध्ये झालं. आता ते सर्व देशात होऊ लागलं आहे. आम्ही महात्मा गांधी यांच्या आयडिया ऑफ इंडियाच्या विचाराने चाललो आहे. महात्मा गांधींच्या या देशाला गोडसेचा देश होऊ देऊ नका'.

मुफ्ती पुढे म्हणाल्या, 'देशात गेल्या ९ वर्षांपासून मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहे. भाजप देशात आरएसएसचा अजेंडा लागू करू इच्छित आहे'.

Opposition Party Meeting
Nana Patole News: पोपटाच्या टीकेला किंमत देत नाही; नाना पटोलेंची चंद्रशेखर बावनकुळेंवर नाव न घेता टीका

विरोधी पक्षनेत्यांची दुसरी बैठक पुढील महिन्यात शिमल्यात होणार

या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, 'लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी एकत्रितपणे अजेंडा करत आहे. १०-१२ जुलै रोजी शिमल्यात आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत अजेंडा तयार करण्यात येईल. तसेच प्रत्येक राज्यात कोणकोणत्या गोष्टी ठरवता येतील, कसे काम करायचे, यावर चर्चा झाली आहे. या बैठकीत प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र रणनीती तयार करण्यात येणार आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com