हैदराबाद : गेल्या काही दिवसांपासून देशात कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या (Covid-19 पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Corona Pandemic) लक्षात घेता आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. देशात कोरोनाची चौथी लाट (Covid 4th wave in India) येईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. अशातच दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये ओमायक्रॉन बीए.4 (Omicron BA.4) सब-व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आला आहे. देशात पहिल्यांदाच या सबव्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Omicron BA.4 First Patient Found In Hyderabad)
मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात आला होता. हैदराबाद येथील विमानतळावरील या रुग्णाची कोरोनाना तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, आता जीनोम सिक्वेंसिंगमध्ये त्या व्यक्तीला ओमायक्रॉनच्या बीए.4 या व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आले. 9 मे रोजी तो व्यक्ती दक्षिण आफ्रिकामधून हैदराबादला आला होता आणि 16 मे रोजी परत गेला. बीए. 4 सब-व्हेरिएंटची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणताही लक्षणे आढळली नाहीत. हैदराबादमधील रुग्ण समोर आल्यानंतर तज्ज्ञांनी देशात इतर शहरांमध्येही बीए.4 या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तवली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा ओमायक्रॉनचा बीए.4 सब-व्हेरिएंटचा रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर तो हळूहळू इतर देशांमध्ये पसरला. एक एक करत जवळपास डजनभर देशांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले. दरम्यान, आता या सबव्हेरिएंटा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे. तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनचा बीए.4 हा सब व्हेरियंट वेगाने भारतात पसरण्याची शक्यता आहे.
भारताला किती धोका?
ओमायक्रॉनचा बीए. 4 सब-व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे सांगितलं जात आहे. हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. दक्षिण आफ्रिकामधील कोरोना हाहा:कार झाला, त्यामागे बीए.4 या व्हेरियंटचाच हात होता. भारतीय शास्त्रज्ञांच्या मते, भारतामध्ये बहुसंख्य लोकांचे लसीकरण झाले असून त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात. भारतीय आता कोरोनाविरोधात लढण्यास सक्षम झाले आहेत. त्यामुळे या नव्या व्हेरियंटचा भारताला जास्त धोका नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून थांबलेली सर्वच क्षेत्राची चाके आता पुन्हा फिरू लागली आहे. परिस्थिती पूर्व पदावर येऊ लागली आहे. कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी नागरिकांनी कोरोनासंबंधी सतर्क राहत नियम पाळावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.