नोएडा: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे (Social Media) युग आहे. सोशल मीडियावर प्रसिध्द होण्यासाठी अनेकजण वेगवेगळे रिल्स बनवतात, पण याच रिल्समुळे अनेक ठिकाणी अपघातही झालेत, आता उत्तर प्रदेशमध्येही रिल्स बनवत असताना एका मुलाचा अपघात झाला. यात त्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील कोतवाली ११३ क्षेत्रात एका १२ वर्षाच्या मुलाचा रिल्स (Reels) बनवताना अपघात झाला आहे.
पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, नोएडा येथील कोतवाली ११३ क्षेत्रातील पृथला या गावात एक १२ वर्षाचा मुलगा सुपरमॅन चा रिल्स बनवत होता. पण हा रिल्स बनवणे त्याला महागात पडले आहे. आपल्या बहिणीचा दुपट्टा बांधून तो मुलगा सुपरमॅन सारखे वरती उडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याचा त्या स्कार्पने गळ्याला फास लागला यात त्या मुलाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू (Death) झाल्याचे जाहीर केले. या मुलाचे नाव बृजेश असे आहे तो १२ वर्षाचा होता.
बृजेशने सुपमॅनचा रिल्स (Reels) बनवण्यासाठी आपल्या बहिणीचा स्कार्प घेतला. घरी सामान ठेवलेल्या बॉक्सवर जावून गळ्यात स्कार्प बांधून हवेत उडण्याचा त्याने प्रयत्न केला. यावेळी त्याची बहिण मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती. यावेली त्याच्या स्कार्पचा एक भाग बॉक्समध्ये अडकला. यामुळे त्याच्या गळ्याला स्कार्पचा फास लागला. यात त्याचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेला मुलगा आई वडिलांना एकुलता एक होता. घटना घडली त्यावेळी मोठी बहीण वगळता चारही बहिणी घटनास्थळी हजर होत्या. पोलिसांना ५१ सेकंदाचा एक व्हिडिओ सापडला आहे, ज्यामध्ये खाली उडी मारण्याआधी संपूर्ण घटना कैद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
बृजेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांपासून त्याला आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला.
Edited By- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.