जुन्या नोटा तुम्हाला बनवू शकतात लखपती; कसं ? वाचा सविस्तर

तुम्हाला जुन्या नोटा आणि नवीन नाणी जमा करण्याची आवड असेल. तसेच तुमच्याकडे जुन्या नोटा आणि नवीन नाणी असतील तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे.
Old note
Old note Saam Marathi
Published On

नवी दिल्ली : तुम्हाला जुन्या नोटा आणि नवीन नाणी जमा करण्याची आवड असेल. तसेच तुमच्याकडे जुन्या नोटा आणि नवीन नाणी असतील तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. या जुन्या नोटा आणि नवीन नाण्यांवरील अनुक्रमांक तुम्हाला लखपती बनवू शकतात. सध्या देशात लोकांमध्ये जुन्या नोटा (Note) आणि नवीन नाणी जमा करण्याचा छंद वाढत चालला आहे. देशातील काही लोक दुर्मिळ चलनी नोटा आणि नवीन नाणी विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करायला तयार होऊ लागले आहेत. जर तुमच्या एखाद्या नोटावर ७८६ हा क्रमांक असेल तर तुम्ही एका रात्रीत लाखो रुपये कमावू शकतात. त्यामुळे एका रात्रीत लखपती होण्याची संधी चालून आली आहे. (Old Note Currency News In Marathi )

Old note
VIDEO: अचानक केबल कार थांबली, दीडशे फुटांवर अडकले ८ पर्यटक अन्...

५ रुपयाच्या नोटेची वैशिष्टये

पाच रुपयाच्या नोटेची वैशिष्ट्ये जाणून घेऊन या. या नोटेची एक मोठं वैशिष्ट्ये आहे. पाच रुपयाच्या नोटेवर जर ७८६ हा अनुक्रमांक असल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्याजवळ ७८६ अनुक्रमांकाची नोट असल्यास तुम्हाला २ लाख रुपये मिळू शकतात. इंटरनेटवर काही पोर्टल आहेत, त्यावर अशा दुर्मिळ नोटांची विक्री होते. या पोर्टलसहित अनेक प्लॅटफॉर्म आहेत, तेथे जुन्या दुर्मिळ नोटा विकल्या जातात. या नोटांच्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपयेही मिळतात.

Old note
'WhatsApp' चा भन्नाट फिचर आला, मर्जीने दाखवा कुणालाही स्वत:चा फोटो आणि स्टेटस

देशात जुन्या दुर्मिळ नोटा जमा करण्याची आवड वाढत चालली आहे. जुन्या नोटा आणि जुन्या नाण्यांची मागणी वाढली आहे,त्यामुळे त्या नोटांच्या बदल्यात चांगला मोबादला (Profit) मिळत आहे. एखाद्या नोटेवर ७८६ हा अनुक्रमांक असेल, तर त्या नोटेची किंमत बाजारातही वाढते. ही नोट घेण्यासाठी काही लोकांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. अनेक प्लॅटफोर्मच्या माध्यमातून या नोटा चांगल्या किमतीत विकू शकतो.

या माध्यमातून जुन्या नोटांची विक्री करा

तुमच्याकडे दुर्मिळ जुन्या नोटा आणि जुन्या नाणी विकून चांगला नफा कमावता येऊ शकतो. Ebay.com या वेबसाईटवर जुन्या नोटा आणि नवीन नाणी सहज विकता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईवट अकाउंट बनवावे लागेल. त्यानंतर तुमच्याजवळील जुन्या नोटा आणि नवीन नाण्यांचे फोटो वेबसाईवटवर अपलोड करावे लागेल. फोटो पाहून त्या नोटा विकत घेण्यासाठी विकत घेणारा संपर्क साधू शकतो. तुम्हाला जी किंमत रुचेल त्या किमतीत तुम्ही जुन्या नोटा आणि नाणी विकू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com