पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशात अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.
बालासोर रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बचाव कार्याची माहिती घेण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 238 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींना गोपालपूर, खंटापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक दुर्घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांशी बातचित करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
अपघातस्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. अपघाताची अनेक वेदनादायक चित्रे समोर येत आहेत. टक्कर एवढी भीषण आहे की, रेल्वेचा काही किलोमीटरचा ट्रॅक गायब झाला आहे. धडकेनंतर मोठा आवाज झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
ओदिशा रेल्वे अपघातावर शोक व्यक्त करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, भीषण रेल्वे अपघात अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारा आहे. या हृदयद्रावक घटनेने मी दु:खी झालो आहे. केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात आयोजित आजचे सर्व कार्यक्रम स्थगित केले जाणार आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओदिशा रेल्वे अपघाताच्या घटनास्थळी दाखल झाले आहे.
Odisha Train Accident Live Updates: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांना एक भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली.
कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे मालगाडीवर चढले. मिळालेल्या माहितीनुसार सात डबे उलटले, चार डबे रेल्वे हद्दीबाहेर गेले. एकूण 15 डब्बेर रुळावरून घसरले आहेत. या वेदनादायक अपघातात आतापर्यंत 233 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.