Odisha Crime: सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी! पती- पत्नीसह २ मुलांची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

Crime News Update: छोट्या भावानेच भावासह त्याच्या कुटुंबाची हत्या केल्याची घटना घडली आहे
Odisa Crime
Odisa Crimesaam tv

Odisha News: संपत्ती आणि पैशासाठी लोक कोणत्या ठराला जातील ह्याचा काही नेम नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताची नातीच जीवावर उठल्याची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. ओडीसामध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ओडीसाच्या बरगढ जिल्ह्यातील झिकीझिकी संपत्तीच्या वादातून भावानेच भावासह त्याच्या कुटुंबाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Odisa Crime
Maharashtra Political News : उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार; नागपुरातील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या संपूर्ण कुटूंबालाच ठार केल्याची घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, भावा-भावांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. याच वादातून सोमवारी रात्री लहान भाऊ मोठ्या भावाच्या घरी घुसला. यानंतर त्याने भाऊ आणि वहिनीसह त्यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केली. मात्र यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांना येताना पाहून आरोपी फरार झाला.

Odisa Crime
Samruddhi Mahamarg Accident: भीषण अपघात..एकाच कुटुंबातील ४ भावंडांचा मृत्यू; अंत्‍यविधीवरून परतताना काळाची झडप

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून संपत्तीच्या वादातून आपण हे कृत्य केल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत, पुढील तपास सुरु केला आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com