मुंबई : पुढील महिन्यापासून म्हणजेच नवीन वर्षापासून एटीएममधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. १ जानेवारी २०२२ पासून ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहार मर्यादा ओलांडण्याकरिता अधिक पैसे द्यावे लागणार आहे. जूनमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना १ जानेवारी २०२२ पासून विनामूल्य मासिक मर्यादेपेक्षा जास्त रोख आणि नॉन- कॅश एटीएम व्यवहाराकरिता शुल्क वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हे देखील पहा-
अॅक्सिस बँकेने सांगितले आहे की, “RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, १-१-२०२२ पासून अॅक्सिस बँक किंवा इतर बँक एटीएम मधील विनामूल्य मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार शुल्क + GST असे आकारु शकणार आहेत. पुढील महिन्यापासून म्हणजेच जानेवारी २०२२ पासून, ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्याकरिता त्यांना प्रति व्यवहार ₹२० ऐवजी ₹२१ द्यावे लागणार आहेत.
RBI ने दिलेल्या माहितीनुसार की, "बँकांना जास्त इंटरचेंज चार्जेसची भरपाई आणि किमतीमध्ये सामान्य वाढ बघता, त्यांना ग्राहक शुल्क प्रति व्यवहार २१ रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे. ग्राहक त्यांच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला ५ मोफत व्यवहाराकरिता आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसह पात्र राहणार आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.