चीनचा उल्लेख होऊ नये म्हणून पंतप्रधान चहात साखरही टाकत नाही - औवैसींचा खोचक टोला

भारतीय सीमेत चीनची घुसखोरी आणि जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद या मुद्द्यांवरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
चीनचा उल्लेख होऊ नये म्हणून पंतप्रधान चहात साखरही टाकत नाही - औवैसींचा खोचक टोला
चीनचा उल्लेख होऊ नये म्हणून पंतप्रधान चहात साखरही टाकत नाही - औवैसींचा खोचक टोलाSaam Tv News
Published On

हैद्राबाद: भारतीय सीमेत चीनची घुसखोरी आणि जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद या मुद्द्यांवरुन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीनचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन औवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी चीनवर बोलण्यास नेहमीच घाबरतात, त्यामुळे चीनचा उल्लेख होऊ नये म्हणून पंतप्रधान चहात साखरही टाकत नाही असा खोचक टोला त्यांनी मोदींना लगावला आहे. (Not to mention China, the Prime Minister does not even add sugar to the tea - Owaisi criticize pm modi)

हे देखील पहा -

आपल्या भाषणात औवैसी म्हणाले की, पंतप्रधान नेहमी दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही, एक म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि दुसरं म्हणजे चीनी सैन्याची भारतीय सीमांमध्ये घुसखोरी... या दोन गोष्टी सोडून बाकी सगळ्यांवर ते बोलतात असा टोला त्यांनी लगावला आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत पण मोदी म्हणतात, ''मित्रों फिकर मत करो'' चीन आपल्या घरात घुसुन बसला, पाकिस्तानने पुलवामा घडवल्यानंतर दहशतवाद्यांना घरात घुसुन मारु, असं मोदी म्हणाले होते पण त्यांनी काहीच केलं नाही. पंतप्रधान मोदी चीनवर बोलण्यास नेहमीच घाबरतात, त्यामुळे चीनचा उल्लेख होऊ नये म्हणून पंतप्रधान चहात साखरही टाकत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

आयबी, अमित शाह काश्मीरमध्ये काय करत आहेत?

पाकिस्तानसोबतच्या सामन्याबाबत बोलताना औवैसी म्हणाले की, आम्हाला भारताच्या पंतप्रधानांना विचारायचे आहे की सैन्याचे नऊ सैनिक मारले गेले आहेत आणि २४ तारखेला भारत आणि पाकिस्तानचे टी २० आयोजित करण्याची तयारी करण्यात येत आहे. भारतीय सैनिक मरत आहेत आणि मनमोहन सिंग सरकार पाकिस्तानला बिर्याणी खायला घालत आहे, असे तुम्हीच म्हटले होते ना? मग नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही पाकिस्तानसोबत टी २० खेळणार आहात? आज पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे, पण तुम्ही काय करत आहात? आयबी, अमित शाह काश्मीरमध्ये काय करत आहेत?,” असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

चीनचा उल्लेख होऊ नये म्हणून पंतप्रधान चहात साखरही टाकत नाही - औवैसींचा खोचक टोला
नवरात्रीच्या घटांचा पर्यावरणपुरक उपयोग; पर्यावरण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...

पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानकडून दहशतवादी, हत्यारे येत आहेत. आपण सीजफायर केले, पण ड्रोनमधून शस्त्रे येत आहेत. दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही धोरण नाही. काश्मीरमध्ये ज्या प्रकारे टार्गेट किलिंग होत आहे त्याला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही धोरण नाही,” असा आरोप औवैसींनी मोदी सरकारवर केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com