नवरात्रीच्या घटांचा पर्यावरणपुरक उपयोग; पर्यावरण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...

झाडांना आळी करून माती व खत स्वरूपात तो घट त्या ठिकाणी पर्यावरण फाऊंडेशनच्या सदस्यांमार्फत त्या झाडांच्या मुळापाशी व्यवस्थित रित्या पुरण्यात आला.
नवरात्रीच्या घटांचा पर्यावरणपुरक उपयोग; पर्यावरण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...
नवरात्रीच्या घटांचा पर्यावरणपुरक उपयोग; पर्यावरण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...सागर आव्हाड
Published On

पुणे: महाराष्ट्राच्या धर्म संस्कृतीत नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र या नवरोत्रोत्सवात जे घट बसवले जातात ते घट उठल्यानंतर काय करतात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. काही जण हे घट नदीला विसर्जित करतात, काही जण आपापल्या परीने त्याची विल्हेवाट लावतात, काही जण ते कचऱ्यात तर काहीजण ते सांडपाण्यात फेकून देताना आपण पाहतो. मात्र पुणे जिल्ह्यातील पर्यावरण फाऊंडेशन मात्र या घटांचे पर्यावरण पूरक उपयोग करत आहेत. (Environmentally friendly use of Navratri drops; Commendable initiative of Paryavaran Foundation)

हे देखील पहा -

हे पर्यावरण उपयोग म्हणजे नेमके काय करतात? तर हे घट मातीत, झाडांच्या खोडाशी पुरून त्याचा उपयोग खत तयार करण्यासाठी करतात. तसेच घाटाच्या वेळी तयार करण्यात आलेल्या कडाकण्या यांचा उपयोग निसर्गात असणारे छोटे-मोठे पशु पक्षी, कीटक यांना अन्न म्हणून करतात. राज्यात पहिल्यांदाच अनोखा पर्यावरण पूरक उपक्रम पर्यावरण फाउंडेशन यांच्या घट समर्पण संकल्पनेतून राबविण्यात आला. नवरात्र उत्सव काळात अनेकांच्या घरात मंदिरात घट स्थापन करण्याची प्राचीन काळापासून प्रथा आहे.

नवरात्रीच्या घटांचा पर्यावरणपुरक उपयोग; पर्यावरण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...
नवरात्रीच्या घटांचा पर्यावरणपुरक उपयोग; पर्यावरण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...सागर आव्हाड

घट म्हणजे शेतातील माती (वावरी) त्या मातीत गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, करडई, जवस, मका, हुलगा अशा विविध प्रकारांचे धान्य मिसळवून मातीत रुजवली जातात. त्यावर एक छोटे मातीचे मडके ठेवून त्यात नारळ ठेवला जातो. अनेक पौष्टिक पदार्थ त्या मातीत मिसळल्याने त्या मातीची पौष्टिकता मोठ्या प्रमाणात वाढते. दररोज त्या घटाला विविध फुलांच्या माळा लावल्या जातात, घटाला नैवैद्य दाखवला जातो, त्या घटाची पूजा केली जाते. नऊ दिवस अशीही घटाची विधिवत पूजा केली जाते. नंतर तो घट वाहणाऱ्या पाण्यात, नदी -नाल्यात, ओढ्यात किंवा काहीजण सांडपाण्यात सोडून देतात. तर या माध्यमातून देवीच्या घटाची अवहेलना होते, या उद्देशाने हा घट झाडांना समर्पित करून त्या झाडांना नवसंजीवनी देण्याचा हा नवीन उपक्रम पर्यावरण फाऊंडेशनच्या माध्यमातून हरेश गोठे, विशाल वाईकर, नंदकुमार बारवकर, विजय रणदिवे, अनिल कवडे व अन्य सदस्यांच्या संकल्पनेतून घट समर्पण हे अभियान कुंजीरवाडी गावात प्रथम राबवण्यात आले.

नवरात्रीच्या घटांचा पर्यावरणपुरक उपयोग; पर्यावरण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...
हजरत मोहंमद पैगंबर यांचे स्त्री सुधारणा विषयक कार्य......

गावात घरोघरी फिरून शेकडोंच्यावर घट गोळा करण्यात आले. फाउंडेशनच्या माध्यमातून मल्हारगडाच्या पूर्वेकडे डोंगरावर जी काही झाडे लावण्यात आलेली आहे, त्या झाडांना आळी करून माती व खत स्वरूपात तो घट त्या ठिकाणी पर्यावरण फाऊंडेशनच्या सदस्यांच्या मार्फत त्या झाडांच्या मुळापाशी व्यवस्थित रित्या पुरण्यात आला. जेणेकरून भविष्यात या झाडाला उत्तम माती व खताची पूर्तता होईल. असा हा पर्यावरण पूरक उपक्रम पर्यावरण फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com