हजरत मोहंमद पैगंबर यांचे स्त्री सुधारणा विषयक कार्य......

हजरत मोहंमद पैगंबर हे केवळ बोलके सुधारक नसून कर्ते सुधारक होते.समाजातील अनिष्ट चालीरितींना आळा घालून स्वतः चांगल्या गोष्टीचे आचरण करून एक सुशिक्षित आणि समृद्ध समाजाची पाया-भरणी त्यांनी केली
हजरत मोहंमद पैगंबर यांचे स्त्री सुधारणा विषयक कार्य......
हजरत मोहंमद पैगंबर यांचे स्त्री सुधारणा विषयक कार्य......- Saam Tv
Published On

(डॉ.अफरोज शेख, प्राध्यापिका मौलाना आझाद कॉलेज औरंगाबाद)

स्लाम Islam धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबरांचा Mohammad Paigambar जन्म इ.स.५७० मध्ये अब्दुल्ला आणि आमेना या दांपत्याच्या घरी मक्का येथ झाला. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांचे पालन- पोषण त्यांच्या काका-काकूंनी केले. इस्लाम धर्मच्या लढ्यापूर्वी संपूर्ण अरब आणि त्यांचा सभोवतालचा परिसर लहान मोठ्या कबिल्या मध्ये विभाजित झालेला होता. Special Article on Mohammad Paigambar Birth Anniversary

तत्कालीन अरब Arab समाज हा क्रूरतेने बरबटलेला होता.अनाचार अत्याचाराचे स्तोम माजले होते. अशा समाजाला नियमबद्ध करणे आवश्यक होते. प्रेषित मोहंमद पैगंबर हे "गार-ए-हिरा"या गुफेमध्ये ध्यानस्थ बसत असत.त्यांना सामाजिक प्रश्नांचे उत्तर हवे होते.जेणे करून सामाज हा सन्मार्गावर येईल. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी अल्लाहचे Allah देवदूत जिब्राईल कडून संदेश प्राप्त झाला. याच संदेशाचा प्रचार व प्रसार त्यांनी इ.स.६१०च्या जवळ पास सुरू केला."अल्लाह एक आहे" हा एकेश्वरवादाचा प्रचारच इस्लम धर्माचा उदय मानला जातो.

समाजाला नियमबद्ध करून शिक्षणाचा प्रसार करणे आवश्यक होते. मानवता हा इस्लाम धर्मचा पाया आहे. त्यांनी संपूर्ण मानव जात ही समान आहे ही विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडून शांती व एकतेचा प्रसार केला....हजरत मोहंमद पैगंबर हे केवळ बोलके सुधारक नसून कर्ते सुधारक होते.समाजातील अनिष्ट चालीरितींना आळा घालून स्वतः चांगल्या गोष्टीचे आचरण करून एक सुशिक्षित आणि समृद्ध समाजाची पाया-भरणी त्यांनी केली. Special Article on Mohammad Paigambar Birth Anniversary

इस्लाम धर्माच्या उदयापूर्वी अरब आणि सभोवतालच्या परिसरामध्ये स्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती. स्त्रीया ह्या केवळ गुलाम वा उपभोग्य वस्तू आहेत, असा समज होता. तत्कालीन अरब समाजामध्ये मुलींना बऱ्याच वेळेस जन्मानंतर जिवंतपणे 'दफन'केले जात असल्याचे प्रकार घडत होते. अशा रानटी आणि क्रूरतेने बरबटलेल्या परिस्थितीमध्ये मोहंमद पैगंबर हे स्रियांचे मुक्तिदाता म्हणून उदयाला आले, आणि त्यांनी स्त्री हत्येला विरोध केला. स्वतः "मुलीचा पिता" हा आदर्श जगासमोर ठेवला. मुलींना देखील सर्वसामन्यां सारखे जीवन जगण्याचा अधिकार आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले.

त्या काळात अनेक युद्ध व्हायची त्यामुळे कित्येक स्त्रीया ह्या विधवा व लहान मुलं ही अनाथ व्हायची,अशा परिस्थितीत विधवांना सन्मानाची वागून मिळावी म्हणून त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी स्वतःहा वयाच्या पंचविसाव्या वर्षी हजरत खुनेजा नावाच्या ४० वर्षीय विधवा महिलेशी विवाह केला होता.त्यांचे हे आचरण संपूर्ण मानवजातीला "स्त्री सन्मानाचा" उपदेश देते.Special Article on Mohammad Paigambar Birth Anniversary

हजरत मोहंमद पैगंबर यांचे स्त्री सुधारणा विषयक कार्य......
Solapur: २० ऑक्टोबरपासून महाविद्यालयांत प्रॅक्टिकलचे वर्ग सुरू होणार

मोहंमद पैगंबरानी ईस्लाम धर्मामध्ये स्त्री जातीला खुप महत्वाचा दर्जा दिला आहे. स्त्रीयां विषयी उपदेश देताना ते असे म्हणतात... आपल्या स्त्रीयां सोबत चांगला व्यवहार करा,आणि त्यांच्या प्रति दयाळू रहा कारण तुमच्या सहयोगी आणि प्रतिबधक सहाय्यक आहेत. तुम्ही जर स्त्रीयांचा आदर करत नसाल तर तुम्ही सच्चे मुसलमान नाही. इस्लामने स्रियांना केवळ दास्या मधून मुक्त समानतेचा अधिकारच दिला नाही तर संपत्तीचा अधिकार देखील दिला आहे. पैत्रूक संपत्ती ही केवळ वारसा हक्काने मुलांच्या मालकीची नसून त्यांवर मुलींचा देखील अधिकार आहे, आधुनिक समाजामध्ये ज्या हक्कासाठी आज देखील स्रियांना अडवले जाते. तो संपत्तीचा अधिकार इस्लाम धर्माने इ.सनाच्या सातव्या शतकात स्रियांना बहाल केला आहे. स्रियांच्या हक्का विषयी बऱ्याच कायद्याची निर्मिती करून खऱ्या अर्थाने प्रेषितांनी समानता व मानवतेचा संदेश दिला आहे,. शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा आरसा असतो. समाज जेव्हढा प्रगत असेल तेवढाच तो कर्तव्यदक्ष राहील, नैतिकता ही शिक्षणाचा पाया आहे,इस्लाम धर्मामध्ये शिक्षणाला अनन्य साधरण असे महत्व प्रदान केले आहे.

पवित्र कुराणाची पहिली "आयत" ही शिक्षणा संबंधी आहे. मोहंमद पैगंबरानी शिक्षण ग्रहण करण्यासाठी स्त्री-पुरुष असा भेदभाव केला नाही. स्रियांना देखील पुरेपूर हक्क प्रदान केला आहे. मोहंमद पैगंबरानी स्त्रीया आणि स्त्री शिक्षणावर विशेष भाष्य केले आहे. ते म्हणतात की ज्यांना मुलगी आहे त्यांनी तिला कमी लेखू नका. उलट तिला मुलाच्या बरोबरीने वागवा.असे केल्याने अल्लाह तुम्हला जन्तत मध्ये जागा देईल. त्यांनी आपल्या उपदेशात स्त्री शिक्षणावर भर दिला आहे. एक सुशिक्षीत स्त्री संपुर्ण शिक्षित करू शकते. त्याच प्रमाणे जो व्यक्ती मुलीची वा बहिणीची योग्य रित्या पालन-पोषण करून त्यांना सुशिक्षित करून सुव्यवस्थितपणे त्यांचा विवाह करुन देतो, त्याला अल्लाह जन्नतचे अधिकारी बनवतो.

मोहंमद पैगंबर यांनी दासी आणि बंधीत स्रियांना देखील शिक्षा- दिशा देण्याचे निर्देश दिले आहेत. स्त्री शिक्षणाला घेऊन इस्लाम धर्म व मोहंमद पैगंबरांचे विचार हे सर्वउत्तम आणि उदारमतवादी आहेत. इस्लामच्या उदयापुर्वी बऱ्याच समाजामध्ये स्रिया ह्या शिक्षणापासून वंचित होत्या, अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या अधिकाराचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. पैगंबरांनी आपल्या शिकवणी मधून केवळ स्रियांना समानतेचा अधिकारच बहाल केला नाही तर त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षणा मध्ये पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले.Special Article on Mohammad Paigambar Birth Anniversary

सुरे,अलबकरच्या आयत मध्ये असे सांगितले आहे की,तुम्ही स्वतः शिका आणि तुमच्या स्रियांना देखील शिकवा.युक्तीला अनुसरून मोहंमद पैगंबरांनी तबलिगी कार्यामध्ये आठवड्यातील एक दिवस फक्त स्रियांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी राखून ठेवला होता. यांची प्रचिती आपल्या तत्कालीन विदुषी स्रियांवरून दिसून येते. ज्या प्रमाणे "सहाबी"फतवे देणारे ज्ञानी पुरुष होते. त्याच प्रमाणे "सहाबीयत"मध्ये काही महिला देखील फतवा द्यायच्या. हजरत आयशा, हजरत उम्मे सलमा आणि हजरत हफजा कडून मोठे-मोठे "सहाबी" फतवे होत असत. हजरत आयशा धार्मिक ज्ञाना व्यतिरिक्त चिक्सी आणि गणित विषयात पारंगत होत्या.

त्या काळातील मुस्लिम स्रियांनी साहित्य,कला,कविता आणि गणित विषयामध्ये महत्वाचे स्थान प्राप्त केले होते.मानवतेचा संदेश देणारे अंतिम मोहंमद पैगंबर यांनी सातव्या शतकामध्ये जे उदारमतवादी विचार मांडले, ते एकविसाव्या शतकामध्ये देखील प्रासंगिक आहेत. त्यांची शिकवण संपूर्ण विश्वाला शांती, सदाचार,समानता,बंधुभाव,सहिष्णूता प्रदान करते. विशेष करून स्त्री विषयक सुधारणा ह्या वर्तमान समाजाला आरसा दाखवण्याचे काम करते.त्यांनी केलेले उपदेश सुधारणा आणि स्रियांना प्रदान केलेले हक्क हे मोहंमद साहेबांना उदारमतवादी, कर्ता,सुधारक,आदर्श पुरुष दीन-दुःखीताचा कैवारी, अनाथांचा नाथ,दासांचा मुक्तिदाता,लिंग,जात,वर्ण,वंश,भेद,नष्ट करणारा समानतेचा बंधुभावाचा पाईक सत्यवचनी म्हणून जगा सामोर त्यांची ओळख निर्माण करते.......

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com