उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ते रशिया दौऱ्यावर आहेत. मात्र किम जोंग विमानाने नाही तर चक्क ट्रेनने रशियाला पोहोचले आहेत. मात्र ही ट्रेन काही साधीसुधी ट्रेन नाही. रुळावर धावणारा महलच आहे. त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी देखील असणार आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यानचा किम जोंग उन यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. किम जोंग आणि पुतीन यांच्या चर्चेचा मुद्दा दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याचा असेल. याशिवाय अमेरिकेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी दोन्ही देश रणनीती बनवू शकतात. याशिवाय उत्तर कोरियामध्ये सध्या दुष्काळ पडला आहे. त्यामुळे तेथे अन्नधान्याचा मोठा तुटवडा आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी किम जोंग रशियाकडे मदत मागू शकतात. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Latest Marathi News)
किम जोंग उन विमानाऐवजी ट्रेनने का प्रवास करतात असता प्रश्न पडू शकतो. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल आणि आजोबा किम इल सुंग हे दोघेही विमान प्रवासास घाबरत होते. किम जोंग इल आणि किम इल सुंग यांनी उड्डाणादरम्यान विमानात स्फोट झाल्याचे पाहिलं होतं. या घटनेनंतर किम इल सुंग यांनी 1986 मध्ये एकदा सोव्हिएत युनियनला भेट दिली होती. तीन दशकांहून अधिक काळात उत्तर कोरियाच्या नेत्याने विमानाने परदेशात जाण्याची ही शेवटची वेळ होती.
किम जोंग उन स्वित्झर्लंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये असताना अनेकदा विमानाने प्रवास करत असत. त्यानंतर 2011 मध्ये उत्तर कोरियाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी उड्डाण करणे जवळपास बंद केले. 2018 मध्ये शेवटच्या वेळी ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी विमानाने सिंगापूरला गेले होते. (National News)
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, किम जोंग उन यांच्याकडे त्यांचे वडील आणि आजोबा वापरत असलेलीच ट्रेन आहे. ट्रेन पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे. ट्रेनमध्ये आलिशान सोफे आणि कॉन्फरन्स रूमची व्यवस्था आहे. ट्रेनमध्ये 21 बुलेटप्रूफ कॅरेज आहेत. त्याच्या ताफ्यात दोन गाड्या धावतात.
सुरक्षेच्या दृष्टीने ही ट्रेन खूप मजबूत असली तरी वेगाच्या बाबतीत ती बाइकपेक्षा कमी वेगाने धावते. ट्रेनचा वेग ५० किमी/तास आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.