Hyderabad Restaurant Crime: बिर्याणीसोबत दही मागितल्याने हत्या; रेस्टॉरंटमधील थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Killed For Asking Curd With Biryani: तुम्हीही हैदराबादी बिर्याणी अनेकवेळा खाल्ली असेल. मात्र बिर्याणी सोबत दही मागितल्याने कुणाची हत्या झाल्याचं तुम्ही एकलंय का?
Hyderabad Restaurant Crime
Hyderabad Restaurant CrimeSaam TV
Published On

Hyderabad Crime News:

बिर्याणी सगळ्यांचीच फेवरेट असते. अशात हैदराबादी बिर्याणी अनेकांच्या पसंतीची. हैदराबादी बिर्याणी मुंबई, पुणेसह अन्य ठिकाणच्या हॉटेल्समध्ये देखील मिळते. मात्र अनेक खवय्ये ही बिर्याणी खाण्यासाठी थेट हैदराबादही गाठतात. तुम्हीही हैदराबादी बिर्याणी अनेकवेळा खाल्ली असेल. मात्र बिर्याणीसोबत दही मागितल्याने कुणाची हत्या झाल्याचं तुम्ही एकलंय का? हैदराबादमध्ये प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Hyderabad Restaurant Crime
Ahmednagar Crime News: हक्काच्या पैशांसाठी गमवावा लागला जीव; मजुरीचे पैसे मागितल्याने चौघांनी केली हत्या

हैदराबादच्या पुंजागुट्टा येथे प्रसिद्ध मेरिडियन बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एक बिर्याणी प्रेमी येथे जेवणासाठी आला होता. आपल्या आवडीची हैदराबादी बिर्याणी त्याने मागवली. बिर्याणीसोबत दह्यातली कोशिंबीर आणखीन मस्त लागते. बिर्याणीची याने चव वाढते. रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेल्या व्यक्तीने मागवलेल्या बिर्याणीसोबत दही दिले नव्हते. त्यामुळे वेटरकडे त्याने दही मागितले.

दह्यातली कोशिंबीर मागताच वेटरने नकार दिला. काही वेळाने या व्यक्तीने पुन्हा दही मागितले. यावेळी हॉटेलमधील अन्य वेटरने त्याला दही नसल्याचे सांगितले. मात्र यावरून हॉटेलमधील कर्मचारी आणि सदर व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली. पुढे त्यांच्यातील वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला एका खोलीत नेले आणि मारहाण केली. मारहाण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांसमोर देखील त्या व्यक्तीला मारहण करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्ती करत हाणामारी थांबवली.

तसेच तक्रार नोंदवण्यासाठी मारहाण झालेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात नेले. येथे पोहचल्यावर तक्रार नोंदवत असताना तो खाली कोसळला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्ती विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलं असा संसार आहे.

Hyderabad Restaurant Crime
Hingoli Crime News: नराधम पित्याचे क्रूर कृत्य! पोटच्या मुलीवर अत्याचार... मुलीची प्रसुती झाल्यानंतर फुटले बिंग; हिंगोली जिल्ह्यात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com