रशिया-युक्रेन (Russia) मागिल दहा दिवसांपासून सुरु आहे. रशियाने युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक युक्रेनी नागरिक ठार झाले आहेत. युक्रेनविरुद्धच्या युद्धावर आता रशियातही टीका होत आहे. नुकतेच पुतीन यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या काही आंदोलकांना रशियातच अटक करण्यात आली होती.
रशियातील टीव्ही चॅनेल्सनीही या हल्ल्याचा निषेध केला. एका टीव्ही चॅनेलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ऑन एअर राजीनामा दिला असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लाइव्ह शोमध्ये 'नो टू वॉर' म्हटल्यानंतर अँकरने राजीनामा दिला. यानंतर संपूर्ण कर्मचारी न्यूजरूममधून निघून गेले.
रशियन अधिकाऱ्यांनी रशियन टीव्ही चॅनेलला युद्धाचे कव्हरेज दाखवण्यास बंदी घातल्यानंतर टीव्ही चॅनेलच्या कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
टीव्ही कर्मचारी शेवटच्या शो मध्ये म्हणाले, नो टू वॉर
चॅनेलवरील शेवटच्या शोवेळी ऑन एअर चॅनेलचे संस्थापक म्हणाले, नो टू वॉर. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊन स्टुडिओतून बाहेर पडले. 'शो अनिश्चित काळासाठी स्थगित केला असल्याच चॅनेलने निवेदनात म्हटलं आहे.
रशियन (Russia) टीव्ही चॅनेलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्यानंतर स्वान लेक बेले डान्सचा व्हिडिओ सुरु केला. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन पतनानंतर हा व्हिडिओ रशियाच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आला होता.
लष्कराच्या विरोधात खोट्या बातम्या दाखवल्यात 15 वर्षाची शिक्षा
शुक्रवारी रशियामध्ये नवीन कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार लष्कराच्या विरोधात खोट्या बातम्या प्रकाशित किंवा प्रसारित केल्यास 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली. शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली.
Edited by- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.