No Confidence Motion 2023: सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर ८ ऑगस्टला लोकसभेत चर्चा, PM मोदीही देणार उत्तर

No Confidence Motion 2023: विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत चर्चा होणार आहे.
No Confidence Motion 2023
No Confidence Motion 2023Saam tv
Published On

PM Modi to answer on No Confidence Motion 2023: केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत चर्चा होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला १० ऑगस्ट रोजी उत्तर देणार आहेत. (Latest Marathi News)

८ ऑगस्टला दुपारी १२ वाजता लोकसभेच्या सभागृहात चर्चेला सुरुवात होईल. मणिपूरच्या घटनेवरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता.

No Confidence Motion 2023
Delhi Services Bill: केंद्र सरकारकडून लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर; विरोधकांचा गदारोळ

अविश्वास प्रस्तावावर होणाऱ्या चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माहिती देतील. मणिपूरच्या घटनेवरून करण्यात येणाऱ्या चर्चेवेळी विरोधकांवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर ते सविस्तर माहिती देतील.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला होता. दोन महिलांना विवस्त्रावस्थेत रस्त्यावर फिरवण्यात आले होते. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनीही या घटनेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेवर निवेदन द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती.

तत्पूर्वी, संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवनाच्या परिसरात मोदींनी मणिपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला होता. एकाही आरोपीला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

No Confidence Motion 2023
Manipur Viral Video Case: 'सुनावणी होईपर्यंत पीडित महिलांचे जबाब नोंदवू नका...' सर्वोच्च न्यायालयाचे CBIला निर्देश

दुसरीकडे, विरोधक या घटनेवरून संसदेत कमालीचे आक्रमक झालेले दिसले. सरकारने या घटनेवर नियम २६७ अन्वये विस्तृत स्वरुपात चर्चा करावी आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी विरोधकांची मागणी आहे.

तर सरकार या घटनेवर नियम १७६ अंतर्गत चर्चा करण्यास तयार आहे, असे सांगण्यात आले. तर चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला. मणिपूरच्या परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील, असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, विरोधकांकडून त्यास विरोध करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com