NMC New Rules: मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता MBBS अभ्यासक्रम 9 वर्षांतच पूर्ण करावा लागणार!

Now MBBS course has to be completed in 9 years: एनईईटी निकाल जाहीर होण्यापूर्वीच एनएमसीने वैद्यकीय अभ्यासाशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत.
NMC New Rules
NMC New Rulessaam tv
Published On

NMC Issued New Rules For Medical Students : नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवा नियम जारी केला आहे. यापुढे वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपासून 9 वर्षांच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार. याशिवाय प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ चारच प्रयत्नांची मुभा असेल. एनईईटी निकाल जाहीर होण्यापूर्वीच एनएमसीने वैद्यकीय अभ्यासाशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत. त्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवेशासाठी होईल कॉमन काउन्सलिंग

ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन 2023 नुसार (GMER) देशातील सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये NEET-UG मेरिट लिस्टच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक कॉमन काउन्सलिंग केले जाईल. यासंबंधीची एक अधिसूचना एनएमसीने 2 जून रोजी जारी केली होती. त्यात कोणत्याही परिस्थितीत एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला प्रथम वर्षासाठी 4 पेक्षा जास्त वेळा प्रयत्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही असे म्हटले आहे.

NMC New Rules
Terrorists Killed : कुपवाडा एलओसीजवळ 2 दहशतवादी ठार, 1 ताब्यात! भारतीय सुरक्षा दलांची मोठी कारवाई

मेडिकलल इंटर्नशिप पूर्ण करणे आवश्यक

एनएमसीने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला पदवीधर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याच्या तारखेपासून 9 वर्षांच्यात आतच अभ्याक्रम पूर्ण करावा लागेल. त्यानंतर अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. अनिवार्य रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप रेग्युलेशन 2021 नुसार, ग्रॅज्युएट मेडिकल कोर्स प्रोग्राममध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने त्याची रोटेटिंग वैद्यकीय इंटर्नशिप पूर्ण करेपर्यंत त्याला पदवीधर मानले जाणार नाही.

कॉमन काउन्सलिंग अनेक टप्प्यात होऊ शकते

एनएमसीने स्पष्टपणे सांगितले आहे की NEET-UG च्या गुणवत्ता यादीच्या आधारे देशातील सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॉमन काउन्सलिंग केले जाईल. अधिसूचनेनुसार ही काउन्सलिंग पूर्णपणे एनएमसीने प्रदान केलेल्या जागांवर आधारित असेल. परंतु गरजेनुसार कॉमन काउन्सलिंग अनेक टप्प्यात केली जाऊ शकते. (Breaking News)

NMC New Rules
Bengaluru YouTuber Attack Update: परदेशी युट्युबरवर हल्ला करणाऱ्याला अखेर अटक, नेमकं प्रकरण काय?

काउन्सलिंगठी अथॉरिटीची नियुक्ती

अंडर-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड (UGMEB) कॉमन काउन्सलिंग आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल आणि नियुक्ती अथॉरिटी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काउन्सलिंग आयोजित करेल. सरकार काउन्सलिंगसाठी एक अथॉरिटीची नियुक्ती करेल. कोणतीही वैद्यकीय संस्था या नियमांचे उल्लंघन करून पदवीधर वैद्यकीय शिक्षण (GME) अभ्यासक्रमासाठी कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देणार नाही. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com