Bihar Political Crisis: सकाळी राजीनामा आणि संध्याकाळी शपथविधी, उद्या नितीश कुमार 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार का?

Bihar News: बिहारमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी सकाळपर्यंत पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Bihar Political Crisis
Bihar Political CrisisSaam Tv
Published On

Bihar Political Crisis:

बिहारमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी सकाळपर्यंत पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्राने सांगितले की, शनिवारी रात्रीही नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत नितीश कुमार पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bihar Political Crisis
Nagpur News: नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार: नितीन गडकरी

सूत्रांनी सांगितलं की, राजीनामा देण्यापूर्वी जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार विधीमंडळ पक्षाची पारंपारिक बैठक घेतील. भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता असल्याने सचिवालयासारखी सरकारी कार्यालये रविवारी उघडी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, भाजपच्या राज्य युनिटच्या नेत्यांनी पक्षाच्या बैठकीत जेडीयूच्या महागठबंधनमधून बाहेर पडल्यास नितीश कुमार यांना पाठिंबा देणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत कोणतीही औपचारिक घोषणा करू नये, अशा सूचना सर्वोच्च नेतृत्वाकडून मिळाल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Bihar Political Crisis
Vishwa Marathi Sammelan: 'मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा', 'विश्व मराठी संमेलन-२०२४' चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

'आज तक'च्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी 10 वाजता जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. त्यानंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक सीएम हाउसमध्येच होईल, असं बोललं जात आहे. बैठकीनंतर नितीश कुमार राजभवनात जाऊन राजीनामा देणार असून एनडीएच्या आमदारांना पाठिंब्याचे पत्रही देऊ शकतात. त्यानंतर 4 वाजता त्यांचा शपथविधी होऊ शकतो. बिहार सचिवालयाची रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच रविवारी सचिवालय उघडे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com