Nigeria Boat Capsized: १०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; २६ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Boat Capsized in North-Central Nigeria: नायजेरियातील सेंट्रल नायजर राज्यातील मोकवा भागात बोट उलटून २६ जणांचा मृत्यू झाला.
Nigeria Boat Capsized
Nigeria Boat CapsizedSaamtv

Nigeria Boat Capsized News: नायजेरीयामधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. नायजेरियातील सेंट्रल नायजर राज्यातील मोकवा भागात बोट उलटून २६ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ४४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. प्रशासनाकडून सध्या बचावकार्य सुरू आहे.

Nigeria Boat Capsized
Jayakwadi Water Level: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ; मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार?

शेतकऱ्यांना घेवून जाणारी बोट उलटली...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नायजेरियात रविवारी बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या बोट अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण बेपत्ता झाले असून सध्या शोधकार्य सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतात घेवून जाताना ही दुर्घटना घडली. या बोटमधून 100 हून अधिक लोक प्रवास करत होते. मोकवा गावाजवळ ही बोट उलटली.

स्थानिक वृतांच्या माहितीनुसार, बोट दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले होती. तर अपघातातील सुमारे 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे. नायजेरियन राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने सागरी पोलीस आणि स्थानिक गोताखोर पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

Nigeria Boat Capsized
Jalna Dengue Fever News : जालन्यात डेंग्यूसदृश तापाने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

दुसरा मोठा अपघात..

दरम्यान, दोन महिन्यांतील नायजेरियामधील हा दुसरा मोठा अपघात आहे. जुलै महिन्यात बोट बुडाल्याने 100 जणांचा मृत्यू झाला होता. नायजर राज्यातील दुर्गम भागात हा अपघात झाला. या अपघाताचे कारण बोटीचे वजन जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अलिकडच्या वर्षांत नायजेरियात घडलेला हा अशा प्रकारचा सर्वात मोठा अपघात होता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com