Jalna Dengue Fever News : जालन्यात डेंग्यूसदृश तापाने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Dengue News : भोकरदन शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
Jalna News
Jalna News Saam TV

Jalna News :

जालना येथे डेंग्यू सदृश तापाने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भोकरदन शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

भोकरदन शहराजवळील आलापूर गावातील 28 वर्षीय वंदना रामेश्वर गायकवाड या महिलेला दोन ते तीन दिवसापासून सतत ताप येत होता. नातेवाईकांनी महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र ताप कमी न झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेला डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याचे निदान झाले होते.  (Latest Marathi News)

Jalna News
Girl Dies Due to Dengue : कल्याणमध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू, परिसरात भीतीचं वातावरण

भोकरनमधीलच वाडी बुद्रूक येथील शिवाजी सखाराम चोरमारे यांचा दोन वर्षाचा मुलगा खुशील याला सुद्धा गेल्या आठवड्यापासून तापाची लागण झाली होती. उपचारासाठी त्याला भोकरदन शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होता. मात्र ताप कमी होत नसल्याने त्याला उपचारसाठी औरगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल दुपारी उपचारादरम्यान त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. (Tajya Batmya)

Jalna News
Mumbai News : दुकानदाराकडे गणपतीची वर्गणी मागायला गेले, पण थेट तुरुंगात पोहोचले; साकीनाका परिसरातून तिघांना अटक

गोंदियामध्ये मलेरियाची साथ

गोंदिया जिल्ह्यात एका महिन्यांत मलेरियाच्या २०२ रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी डासांपासून जास्त सावध राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.मलेरियामुळे जालन्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com