Railway Station Stampede : दादा आपली सुरुची, तुझे सासरे अन् सासू या जगात नाही; दिल्लीत सर्व संपलं...

New Delhi Railway Station Stampede : सुरूचीच्या आजी (आईची आई) सुनैना देवी यांनी सांगितले की, सुरूची काही वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसोबत दिल्लीत राहत होती आणि तिथेच सहावी इयत्तेत शिक्षण घेत होती.
New Delhi Railway Station Stampede
New Delhi Railway Station Stampede SaamTV
Published On

नवी दिल्ली : मुजफ्फरपूरमधील ११ वर्षीय चिमुकली सुरूचीचा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. सुरूचीचे कुटुंब बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बरियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरपूर गावात राहते. सुरूची आपल्या आजी-आजोंबासोबत (आईचे आई-वडील) प्रयागराजला जात असताना रेल्वे स्थानकावर अचानक चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत ती आणि तिच्या आजी-आजोंबाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सुरूचीच्या गावात शोककळा पसरली असून तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुरूचीच्या आजी (वडिलांची आई) सुनैना देवी यांनी सांगितले की, सुरूची काही वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसोबत दिल्लीत राहत होती आणि तिथेच सहावी इयत्तेत शिक्षण घेत होती. तिचे मामा-मामी समस्तीपूर जिल्ह्यातील कोठिया येथे राहतात. तिचे आजोबा विजय साह आणि आजी कृष्णा देवी एक दिवस आधी दिल्लीला गेले होते आणि सुरूचीला घेऊन प्रयागराजला जात होते. मात्र, अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

New Delhi Railway Station Stampede
New Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १५ भाविकांचा मृत्यू

सुरूचीच्या कुटुंबीयांना रात्री उशिरा ही दुःखद बातमी मिळाली. तिचे वडील मनोज साह दिल्लीत गाडी चालवतात आणि त्यांना मुलीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर ते सुन्न झाले. दादा नरेश साह यांनी सांगितले की, “रात्री १२ वाजता फोन आला आणि सांगितलं की सुरूची, तिचे आजोबा आणि आजी आता जगात नाहीत”, या घटनेनं संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

ही दुर्घटना नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १६ आणि १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर घडली. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले आहे. भारतीय रेल्वेने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून मृतकांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

New Delhi Railway Station Stampede
Delhi Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर, वाचा INSIDE STORY

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com