रूग्णांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नॅशनल ड्रग प्रायसिंग ऑथोरिटी म्हणजेच राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने ८ औषधांच्या किमती वाढवल्या असल्याचं समोर आलं आहे. मुळात यामध्ये सरकारने या औषधांच्या ११ फॉर्म्युलेशनच्या किमती ५० टक्क्यंनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही औषधे बनविण्याच्या खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणासोबतच्या बैठकीमध्ये औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान याचा नेमका परिणाम कसा होणार आहे ते पाहूयात.
हा निर्णय कंपन्यांना होणार्या नुकसानीचा विचार करता घेण्यात आला आहे. या औषधांचे कमाल दर इतके कमी होते की, त्यांची निर्मिती आणि मार्केटींग करणाऱ्या कंपन्यांना तोटा सहन करावा लागायचा. यामुळे काही कंपन्यांनी त्यांचं मार्केटिंगही बंद केलं. यानंतर काही कंपन्यांनी एनपीपीएला त्यांचं मार्केटिंग थांबवण्याचं आवाहनही केलं होतं. ही अत्यंत महत्त्वाची आणि सामान्य औषधं असल्याने त्यांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आणि रुग्णांसोबतच डॉक्टरांनाही अनेक तुटवड्याचा सामना करावा लागला.
NPPA ने ज्या औषधांच्या कितमी वाढवल्या आहेत, त्यामध्ये ग्लुकोमा, अस्थमा, टीबी, थॅलेसिमिया तसंच मानसिक आरोग्याच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. यावेळी ज्या फॉर्म्युलेशनचे दर वाढले आहेत त्यात Benzyl Penicillin 10 Lakh IU Injection, Salbutamol गोळ्या 2 mg आणि 4 mg आणि Respirator Solution 5 mg/ml यांचा समावेश आहे. ही औषधं प्रथम श्रेणी उपचारांसाठी वापरण्यात येतात.
सफड्रोक्सील टॅबलेट 500 मिलीग्राम
एट्रोपिन इंजेक्शन 06 एमजी/एमएल
स्ट्रेप्टोमायसिन पावडर 750 मिलीग्राम आणि 1000 मिलीग्राम
डेस्फेरिओक्सामाइन 500 मिलीग्राम
ज्या फॉर्म्युलापासून औषधं बनवण्या जातात त्यांना फॉर्म्युलेशन म्हणतात. औषधं तयार करणं ही एक प्रकारची प्रक्रिया आहे. ज्यामध्ये औषधांच्या विविध घटकांना एकत्रित करून एक विशेष प्रकारचा घटक तयार केला जातो. साधारणपणे औषधं गोळ्या, कॅप्सूल, सिरप किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात तयार करण्यात येतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.