Karnataka Election : 2023 च्या विधानसभा निवडणुकांबाबत कर्नाटकात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्याआधीच पक्षांतर्गत हालचाली सुरु झाल्या आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षाने आपली कंबर कसली आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील निवडणुकीत जोरदार मुसंडी मारण्याची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कर्नाटकात 40-45 जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे.
कर्नाटकात १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मोठी बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. (Latest Political News)
तत्पूर्वी राष्ट्रवादीसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाला पक्षाकडून पत्र लिहिण्यात आले होते त्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर राष्ट्रवादी आता कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
2018 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची काय स्थिती होती?
2018 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकात 14 जागा लढवल्या होत्या. कर्नाटकातील 224 विधानसभा जागांवर सत्ताधारी भाजपचे सध्या 119 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे 75 आणि मित्रपक्ष जेडीएसचे 28 आमदार आहेत.
एका टप्प्यात होणार मतदान
दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने 29 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कर्नाटक राज्यात 10 मे रोजी एकूण 224 जागांसाठी मतदार पार पडणार आहे. तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.