...तर ओबीसी समाज अडचणीत आला नसता; छगन भुजबळांची केंद्र सरकारवर टीका

केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक जनगणनेची माहिती देशभरातील राज्यांना दिली असती तर ओबीसी समाज अडचणीत आला नसता, अशा शब्दात भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal saam tv
Published On

रश्मी पुराणिक

नवी दिल्ली : आज देशभरातील ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा मोठा प्रश्न देशात उभा राहिला आहे. सुरवातीला महाराष्ट्र, मध्यप्रदेश आता गुजरात आणि गोवा मध्ये देखील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे.

त्यामुळे आरक्षणाची वारंवार निर्माण होणारी परिस्थिती पाहता केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagab Bhujbal) यांनी नवी दिल्ली येथे केली. केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक जनगणनेची माहिती देशभरातील राज्यांना दिली असती तर ओबीसी समाज अडचणीत आला नसता, अशा शब्दात भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली. (Chhagan bhujbal News In Marathi )

Chhagan Bhujbal
Sharad Pawar : माणसातल्या विठ्ठलाचे दर्शन झाले; पवारांसोबत विमानातून प्रवास केल्यानंतर कार्यकर्त्याची भावना

ऑल इंडिया सैनी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मंत्री छगन भुजबळ हे आज दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, 'मध्यप्रदेश सरकारने इम्पिरिकल डाटा दाखल केला आणि त्यांचे पंचायत राज मधील ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) पूर्ववत झाले.

दोन दिवसात महाराष्ट्र सरकार सुद्धा कोर्टात डाटा देईल आणि महाराष्ट्राचे देखील आरक्षण पूर्ववत होईल. मात्र आता हाच प्रश्न गुजरातमधील ग्रामपंचायतीमध्ये निर्माण झाला आहे. तिकडे गोव्यात देखील हीच परिस्थिती आहे. हळूहळू सर्व देशात हीच परिस्थिती होईल. मुळात केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक जनगणनेची माहिती देशभरातील राज्यांना दिली असती तर ओबीसी समाज अडचणीत आला नसता, असे मत देखील छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

Chhagan Bhujbal
तर आम्ही...! विराेधी पक्ष नेते अजित पवारांनी एकनाथ शिंदे सरकाराला दिला इशारा

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी,यासाठी आता न्यायालयीन आणि राजकीय संघर्ष करावा लागेल. सर्व पक्षातील ओबीसी नेत्यांनी ओबीसींच्या जनगणेसाठी आवाज उठवावा अशी मागणी करतानाच ओबीसींच्या प्रश्नांसाठी देशभरातील ओबीसींना एक होऊन लढावे लागेल, असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ पुढे म्हणाले की, 'ओबीसी समाजाला आरक्षण हे मोठा संघर्ष करून मिळाले आहे. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्या यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. विधिमंडळ पासून संसदेपर्यंत हा संघर्ष आम्ही केला आहे. त्यामुळे बहुसंख्य असलेल्या ओबीसी समजावर असा अन्याय करता येणार नाही. आणि हा अन्याय आम्ही होऊ देणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com