नवज्योत सिंग सिद्धूंना न्यायालयाचा दणका; सिद्धूंची अटक अटळ

सिद्धू यांनी शरणागतीतून सुटका होण्याच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Navjot Singh Sidhu
Navjot Singh SidhuSaam TV
Published On

नवी दिल्ली : नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सिद्धू यांनी शरणागतीतून सुटका होण्याच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सिद्धू यांना आज पतियाला कोर्टात शरण येणार होते. मात्र त्यांनी शाररिक समस्येचे कारण देत शरणागतीसाठी वेळ द्यावा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणी न्यायालयाने फेटाळल्यामुळे सिद्धू यांना अटक होणं आता अटळ आहे.

दरम्यान, सिद्धू यांच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी करताना, ती सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवावी, असे सांगण्यात आलं होतं. दरम्यान, सिद्धू यांच्या वकीलाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. पण सरन्यायाधीशांनी याला परवानगी दिली नाही. तसंच याबाबतची याचिका आधि रजिस्ट्रीकडे देण्यास सरन्यायाधिशांनी सांगितंल होत. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) तात्काळ सुनावणीस नकार दिल्यानंतर आता सिद्धूचे वकील कोर्ट रजिस्ट्रीमध्ये जाणार असून या प्रकरणाची सुनावणी घेण्याची विनंती करणार आहेत.

काय आहे प्रकरण?

पतियाळा येथे १९८८ मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते. या भांडणामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com