PM Modi Record: पंतप्रधान मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ राहिलेले दुसरे पंतप्रधान

PM Modi Break Indira Gandhi Record: नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे दुसरे नेते बनले आहेत. त्यांनी इंदिरा गांधींचा विक्रम मोडलाय.
PM Modi Record
PM Modi Break Indira Gandhi Recordsaam Tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींचा विक्रम मोडलाय. ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेलं दुसरे नेते बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जुलै रोजी अधिकृतपणे सर्वाधिक काळ भारताच्या पंतप्रधान राहिले आहेत. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याची नोंद इतिहासात झालीय. याआधी इंदिरा गांधी ह्या सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणाऱ्या पंतप्रधान होत्या.

१९६६ ते १९७७ दरम्यान इंदिरा गांधी ह्या ४,०७७ दिवस पंतप्रधानपदावर राहिल्या होत्या. तर पंतप्रधान मोदींची पंतप्रधानपदाची कारकीर्द ही ४,०७८ दिवस इतकी झालीय. नरेंद्र मोदी आता फक्त भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मागे आहेत. पंडीत जवाहरलाल हे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदावर राहिलेत.

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारताने अद्वितीय कामगिरी केलीय. मोदी स्वातंत्र्यानंतर जन्मलेले भारतातील पहिले पंतप्रधान आहेत. जे सर्वात जास्त काळ राहणारे बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत. उल्लेखनीय म्हणजे, मोदी हे दोन पूर्ण टर्म पूर्ण करणारे आणि स्पष्ट बहुमताने दोनदा पुन्हा निवडून येणारे पहिले बिगर-काँग्रेसी नेते आहेत. १९७१ मध्ये इंदिरा गांधींनंतर सलग सार्वत्रिक निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येणारे ते पहिले विद्यमान पंतप्रधान आहेत. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी सलग तीनवेळा आपल्या पक्षाला विजय मिळवून दिलाय.

PM Modi Record
India-UK Free Trade Agreement: भारत-ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार; 'या' वस्तू होणार स्वस्त

चहा विक्रेता ते जागतिक राजकारणी

मोदींचा राजकीय प्रवास जितका उल्लेखनीय आहे तितकाच तो दमदार आहे. गुजरातमधील वडनगर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मोदींनी कधी काळी वडिलांसोबत रेल्वे स्टेशनवर चहा विकली होती. आता ते एक जागितक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) प्रवेश केला होता.

त्यानंतर भारतीय जनता पक्षातून राजकीय करिअरला सुरुवात केली. त्यांनी एका दशकाहून अधिकचा काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर ते एक जागतिक नेते बनले आहेत. त्यांच्या जवळजवळ २४ वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय नेत्यामध्ये रूपांतरित केले आहे.

कार्यकाळानुसार भारतीय पंतप्रधानांची यादी

जवाहरलाल नेहरू :

कार्यकाळ १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४

वर्ष आणि दिवस: ६,१३० (१६ वर्षे, ९ महिने आणि १३ दिवस - अंदाजे १७ वर्षे)

नरेंद्र मोदी :

कार्यकाळ २६ मे २०१४ -

वर्ष आणि दिवस चालू ४,०७८ दिवस.

PM Modi Record
Constitutional Changes: सरकार संविधानातून 'समाजवाद' आणि 'धर्मनिरपेक्षता' शब्द काढणार? केंद्रीय नेत्यानं स्पष्ट केली भूमिका

इंदिरा गांधी :

कार्यकाळ - २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७

वर्ष आणि दिवस - ४,०७७ दिवस

मनमोहन सिंग :

कार्यकाळ - २२ मे २००४ ते २६ मे २०१४

वर्ष आणि दिवस - १० वर्षे ४ दिवस

अटलबिहारी वाजपेयी :

कार्यकाळ १६ मे १९९६ ते १ जून १९९६ | १९ मार्च १९९८ ते १२ ऑक्टोबर १९९९ | १३ ऑक्टोबर १९९९ ते २२ मे २००४

एकूण ३ वेळा पंतप्रधानपदी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com