CM Kanyadan Yojana: संतापजनक! सामुहिक विवाह सोहळ्यापूर्वी व्हर्जिनिटी आणि प्रेग्नेंसी टेस्ट, काहींना विवाहापासून रोखले

Mukhyamantri Kanyadan Yojana: सामुहिक विवाह सोहळ्यात काही मुलींचे लग्न लावले गेले नाही, कारण त्या कौमार्य आणि गर्भधारणा चाचणीत नापास झाल्या होत्या.
CM Kanyadan Yojana
CM Kanyadan Yojanasaam tv

MP News, Virginity and pregnancy test of girls before marriage: मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत होणाऱ्या विवाहांबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विवाह सोहळ्यात काही मुलींचे लग्न लावले गेले नाही, कारण त्या कौमार्य आणि गर्भधारणा चाचणीत नापास झाल्या होत्या.

या प्रकारावरून काँग्रेसने शिवराजसिंह चौहान सरकारला घेरले आहे. यावर स्पष्टीकरण देताना भाजपच्या एका नेत्याने काँग्रेसचे यात राजकारण करत असून अशा चाचण्या पूर्णपणे न्याय्य असल्याचे म्हटले आहे.

CM Kanyadan Yojana
Amol Kolhe News: 'राष्ट्रवादीतून भाजपमध्ये...' फोटो शेअर करत अमोल कोल्हेंनी दिले स्पष्ट संकेत? पोस्ट व्हायरल

मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्यातील गडसराय येथे शनिवारी मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत 219 जोडप्यांचा सामुहिक विवाह पार पडला. या सोहळ्यात काही मुली लग्नासाठी आल्या, परंतु त्यांची नावे यादीत नव्हती. त्याची चौकशी केली असता त्या गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचे नाव यादीत आले नाही. यावर प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस नेते आणि माजी मंत्री ओंकार मरकाम यांनी राज्य सरकारने असे नियम केले असतील तर ते जाहीर करावेत असे म्हटले आहे.

मंडपात पोहोचूनही नाही झाले लग्न

मीडिया रिपोर्टनुसार, एका तरुणीने सांगितले की तिनेही या योजनेसाठी फॉर्म भरला होता. नंतर सामुदायिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यात गर्भधारणा चाचणीचाही समावेश होता. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तिचे नाव यादीतून वगळण्यात आले. असाच प्रकार इतर काही मुलींबाबतीत घडला आणि लग्नमंडपात पोहोचूनही त्यांचे लग्न होऊ शकले नाही. (Latest Marathi News)

CM Kanyadan Yojana
Uddhav Thackeray In Jalgaon : खोट्या दंडात बेडक्या फुगवल्या जातायत...; अंबादास दानवे यांचा शिंदे गटाला टोला

भाजप आमदार म्हणाले चाचण्या न्याय्य

एका सरपंचाने सांगितले की, त्यांच्या गावातून 6 फॉर्म पाठवण्यात आले होते. परंतु काहींचे लग्न होऊ शकले नाही. गर्भधारणा चाचणी करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. याबाबत दिंडोरी भाजपचे अध्यक्ष अवधराज बिलैया यांनी सांगितले की, यापूर्वी काही मुली लग्नाच्या वेळी गरोदर राहिल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत या चाचण्या न्याय्य आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्हाला जे आदेश दिले होते तेच केले. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com