विक्रमी लसीकरणाच्या मुद्दयावरुन मोदींचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला, म्हणाले..

"माझ्या वाढदिवसाला अडीच कोटी लस मिळाल्यानंतर एका राजकीय पक्षाला ताप आला'' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
विक्रमी लसीकरणाच्या मुद्दयावरुन मोदींचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला, म्हणाले..
विक्रमी लसीकरणाच्या मुद्दयावरुन मोदींचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला, म्हणाले..Saam Tv News
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशाने एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला तो म्हणजे एका दिवसांत सुमारे २.५ कोटी जनतेचे कोविड लसीकरण करुण्याचा. या एकाच दिवशी देशात अडीच कोटी जनतेला कोरोना लस टोचण्यात आली. यावरुन आता राजकारणही सुरु झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोग्यसेवा कर्मचारी आणि गोव्यातील लस लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही संवादात भाग घेतला. (Modi's indirect attack on Congress on the issue of record vaccination)

हे देखील पहा -

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''मला सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, देशाच्या प्रशासनाशी संबंधित लोकांचे कौतुक करायचे आहे. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे काल भारताने एकाच दिवसात 2.5 कोटींहून अधिक लोकांना लस देण्याचा विक्रम केला आहे. वाढदिवस खूप आले आणि गेले, पण कालचा दिवस खूप भावनिक होता. भारताने आपल्या लसीकरण मोहिमेत पर्यटन क्षेत्राशी संबंधित राज्यांना खूप प्राधान्य दिले आहे पण याची  फार चर्चा झाली नाही. पयर्टन क्षेत्रातील राज्यांना लसीकरणाला प्राधान्य देण्याबाबत सुरुवातीला आम्ही नाही म्हटले कारण यावरही राजकारण होऊ शकते. पण आपली पर्यटन स्थळे उघडली जाणे अत्यंत महत्वाचे होते.

कॉंग्रेसवर नाव न घेता टीका

वाढदिवसाच्या दिवशी रेकॉर्ड लसीकरणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझ्या वाढदिवसाला अडीच कोटी लस मिळाल्यानंतर एका राजकीय पक्षाला ताप आला." कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी रेकॉर्ड लसीकरणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला मोदींनी न घेता प्रत्युत्तर दिलं आहे.

विक्रमी लसीकरणाच्या मुद्दयावरुन मोदींचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला, म्हणाले..
Politics : पंजाब प्रदेश काँग्रेस मध्ये गटबाजी; ४० आमदार नाराज!

मोदींच्या वाढदिवशी किती लसीकरण झाले?

मोदींच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. शुक्रवारी केवळ 17 तासात 2.5 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. कोरोना लस 2,51,21,261 लोकांना रात्री 1 पर्यंत देण्यात आली, म्हणजेच 14.77 लाख लोकांना दर तासाला कोरोनाची लस देण्यात आली. देशात 1,09,686 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com