Arvind Kejriwal Speech : केजरीवालांचे भाषण अन् 'मोदी...मोदी'च्या घोषणा; मुख्यमंत्री थांबले, बेधडक बोलले

Arvind Kejriwal Speech at IP University : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू असतानाच उपस्थित काही कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या.
Arvind Kejriwal Speech at IP University
Arvind Kejriwal Speech at IP University Saam TV
Published On

Arvind Kejriwal Speech at IP University : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू असतानाच कार्यक्रमाला उपस्थित काही कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या. त्यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी संबंधित कार्यकर्त्यांना शिक्षण व्यवस्थेवरून टोला लगावला. सर्व शांत झाल्यानंतर केजरीवालांनी आपलं भाषण पूर्ण केलं. (Tajya Batmya)

गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या (IP यूनिवर्सिटी) पूर्व दिल्लीतील कॅम्पसच्या उद्घाटन सोहळ्यात हा प्रकार घडला. अरविंद केजरीवाल यांनी व्यासपीठावर भाषण सुरू केले. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी 'मोदी...मोदी' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी संबंधित कार्यकर्त्यांना सडेतोड उत्तर दिले.

Arvind Kejriwal Speech at IP University
RBI On 500 Rs Notes: मोठी बातमी! 500 रुपयांच्या नोटाही बंद होणार? RBI ने दिले स्पष्टीकरण

जर अशा घोषणांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होऊ शकली असती तर, ७० वर्षांत ती झाली असती, असं उत्तर अरविंद केजरीवाल यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलं. आम आदमी पक्षाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, असा आरोप 'आप'ने ट्विटद्वारे केला आहे.

Arvind Kejriwal Speech at IP University
Madhya Pradesh News: 300 फूट खोल बोअरवेलमध्ये चिमुकलीचा अडकला श्वास, NDRF चा 48 तासांपासून संघर्ष; नळ्यांमधून ऑक्सिजन, रोबोटही मागवले

व्हिडिओमध्ये काय?

या कार्यक्रमात व्यासपीठावर अरविंद केजरीवाल भाषणासाठी उभे आहेत. दुसरीकडे मोदी-मोदीच्या घोषणा ऐकायला मिळत आहेत. मात्र, ते ऐकून अरविंद केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे. या पक्षाच्या आणि दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही विनंती करतो की मी काय बोलतो ते ५ मिनिटे ऐकून घ्या. तुम्हाला जर आवडलं नाही तर, तुम्ही घोषणाबाजी सुरू ठेवू शकता.' असे केजरीवाल म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com