Chinese App ban: मोदी सरकारचा चीनवर डिजिटल स्ट्राईक; 200 हून अधिक चिनी अॅप्सवर घातली बंदी

मोदी सरकारने पुन्हा एकदा चिनी अॅप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे.
Chinese App ban
Chinese App banSaam tv

Chinese App ban News : मोदी सरकारने पुन्हा एकदा चिनी अॅप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. सुरक्षेचा हवाला देत २०० हून अधिक अॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारने १३८ बेटिंग अॅप्स आणि ९४ लोन अॅप्सवर बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाकडून माहिती मिळाली आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चिनी अॅप्सवर बंदी आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Latest Marathi News)

गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने १३८ बेटिंग अॅप्स आणि ९४ लोन (Loan) लेंडिंग अॅप्सवर 'तातडीच्या' आणि 'आणीबाणीच्या' आधारावर बंदी आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Chinese App ban
Cyber Crime: केवायसी करणे पडले महागात; ऑनलाईन ९७ हजार रुपयांत गंडा

गृहमंत्रालयाने ६ महिन्यांपूर्वी २८८ चिनी लोन अॅप्सवर देखरेख करण्याचे काम सुरू केले होते. २८८ चिनी अॅप्सपैकी ९४ अॅप्स हे अॅप्स स्टोअरवर उपलब्ध आहेत. तर काही थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत आहे. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला गृह मंत्रालयाने या आठवड्यात हे अॅप्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), ओडिशा आणि तेलंगणा या सारख्या राज्यांनी केंद्रीय गुप्तचर संस्थांनी या अॅप्सवर कारवाई करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली. त्यानंतर १३८ बेटिंग अॅप्स आणि ९४ लोन अॅप्सवर तात्काळ आणि आणीबाणीच्या आधारावर बंदी आणि ब्लॉक करण्यात आले आहे.

Chinese App ban
Valentine's Day: काय सांगता! १० कोटी लोकांना कंडोम वाटप; 'या' देशाने घेतला निर्णय

दरम्यान, लोन अॅप्समध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय कर्ज दिले जाते. लोन अॅप्सवर तात्काळ कर्ज दिले जाते. मात्र, कर्जवसुली करताना अॅप्स चालक धमकी देऊन पैसे वसुल करतात. त्यावेळी शिवीगाळ देखील केली जाते. या कारणात्सव ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेक जण जीवन यात्रा देखील संपवतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com