MiG-29K Night Landing Video: नौदलाने रचला इतिहास! पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात INS Vikrant वर उतरले मिग-29K लढाऊ विमान

INS Vikrant Night Landing : यापूर्वी एलसीए तेजसच्या नौदलाच्या व्हर्जननेही आयएनएस विक्रांतवर यशस्वी लँडिंग केले होते. पण हे लँडिंग दिवसा झाले होते.
MiG-29K Night Landing Video
MiG-29K Night Landing Videosaam tv

MiG-29K fighter aircraft landed on INS Vikrant at Night: भारतीय नौदलाने बुधवारी रात्री इतिहास रचला आहे. रात्रीच्या अंधारात पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS विक्रांतवर मिग-२९के या लढाऊ विमानाने यशस्वी लँडिंग केले आहे. ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे भारतीय नौदलाने निवेदनात नौदलाने म्हटले आहे.

रात्रीच्या वेळी कोणत्याही विमानवाहू जहाजावर विमान उतरवणे नौदलाच्या वैमानिकांसाठी आव्हानात्मक मानले जाते. कारण त्या वेळी युद्धनौकेचा वेग ताशी 40-50 किमी इतका असतो आणि वैमानिकांना विमानाच्या वेगाशी ताळमेळ साधावा लागतो. यापूर्वी एलसीए तेजसच्या नौदलाच्या व्हर्जननेही आयएनएस विक्रांतवर यशस्वी लँडिंग केले होते. पण हे लँडिंग दिवसा झाले होते. याशिवाय 28 मार्च रोजी कामोव हेलिकॉप्टरही आयएनएस विक्रांतवर उतरवण्यात आले होते.

MiG-29K Night Landing Video
HSC Answer Sheet Fraud: तो पराक्रम शिक्षकांचाच! बारावीच्या ३७२ उत्तरपत्रिकेतील दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध अखेर लागलाच

नौदलाने मिग-29 च्या लँडिंगचा व्हिडिओही ट्विट केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, एक ऐतिहासिक यश मिळवत भारतीय नौदलाने पहिल्यांदाच रात्री INS विक्रांतवर MiG-29K लढाऊ विमानाचे लँडिंग केले. नौदलाने याला आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हटले आहे.

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगिले की, बुधवारी रात्री आयएनएस विक्रांत अरबी समुद्राच्या लाटांवर धावत असताना मिग-२९ लढाऊ विमान पहिल्यांदाच त्यावर यशस्वी लँडिंग केले. रात्री लँडिंगच्या चाचणीतून विक्रांतच्या क्रू आणि नौदलाच्या वैमानिकांचे प्रोफेशनलिज्म आणि क्षमता दिसून येते असेही ते म्हणाले. (Breaking News)

MiG-29K Night Landing Video
Mumbai News : झोपडीधारकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, राज्य सरकारकडून अवघ्या 2.50 लाखांत मिळणार घर

भारतात बनवलेली INS विक्रांत 20000 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते नौदलात सामील झाले होते. याची निर्मिती केरळच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडने केली आहे.

मिग 29 के लढाऊ विमानं ही आयएनएस विक्रांतच्या युद्ध ताफ्यातील एक महत्त्वाचा भाग आहेत. हे एक अतिशय प्रगत विमान आहे जे कोणत्याही वातावरणात उड्डाण करण्यास सक्षम आहे. ध्वनीच्या दुप्पट वेगाने (ताशी 2000 किमी) उड्डाण करण्यास हे विमान सक्षम असून ते त्याच्या वजनापेक्षा 8 पट अधिक युद्ध सामग्री वाहून नेऊ शकते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com