Chhatrapati Sambhajinagar HSC Result
Chhatrapati Sambhajinagar HSC Result saam tv

HSC Answer Sheet Fraud: तो पराक्रम शिक्षकांचाच! बारावीच्या ३७२ उत्तरपत्रिकेतील दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध अखेर लागलाच

Chhatrapati Sambhajinagar HSC Result : उत्तरपत्रिकेत एकाच अक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांसह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर बोर्डाने अखेर निकालाच्या दिवशी बारावीच्या ३७२ उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध लावला आहे. या ३७२ उत्तरपत्रिकेत एकाच अक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांसह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यात एका प्राध्यापिकेचाही समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर बोर्डातील हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील ३७२ उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीने लिहिलेले अक्षर कुणाचे आणि कशासाठी लिहिले याचा शोध बोर्ड घेत होते. अखेर १५ दिवसानंतर ते थेट बारावीच्या निकालाच्याच रोजी गुन्हेगार कोण याचा शोध लावण्यात बोर्डाला यश आलेय.

एकाच अक्षरात उत्तरे लिहिणाऱ्या संशयित असलेल्या दोन अध्यापकासह पडद्यामागील साथीदारावर ४२०, ४६७, ४६८, ४६९ व ४७० कलमाअंतर्गत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासन पुढील तपास करुन या प्रकरणात दोषींवर कारवाई करेल.

Chhatrapati Sambhajinagar HSC Result
Sharad Pawar News: संसदेत राष्ट्रवादी 'आप'च्या पाठीशी... केजरीवाल यांच्या भेटीनंतर पवारांचे आश्वासन; म्हणाले...

बारावीच्या भौतीकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळून आले होते. त्याचा शोध घेण्यासाठी बोर्डाने एक समिती नेमली. तब्बल 15 दिवस चौकशी सुरू होती. बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील उत्तरपत्रिकात लिहिले कोणी याचं उत्तर मिळणं कठीण झाले होते. त्यासाठी परिक्षा नियामक, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, कस्टोडियन, परीक्षक, मॉडरेटर, मुख्याध्यापक आदींची चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशी अंती समितीने संबंधित दोन्ही अध्यापकांना दोषी ठरविल्याचा अहवाल सादर केला. (Breaking News)

यात सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयाचे उध्यापक राहुल उसारे आणि अध्यापिका मनिषा शिंदे यांच्याकडे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. १३ मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश असताना संबंधित शिक्षकांनी २५ दिवस स्वतःकडे ठेवून ८ एप्रिल रोजी बोर्डाकडे परत पाठवल्या होत्या.

या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर यामध्ये अक्षर बदल असल्याची तक्रार देखील बोर्डाकडे केली नव्हती. त्यानंतर उत्तरपत्रिकांची पुर्नतपासणी करत असताना ही बाब मॉडरेटच्या लक्षात आली. त्यामुळे बोर्डामार्फत यासंदर्भात एक तपासणी समिती गठीत करण्यात आली. आता याबाबत पोलीस चौकशी करतील असे बोर्डाने सांगितले आहे. (Latest Political News)

Chhatrapati Sambhajinagar HSC Result
Mumbai News : झोपडीधारकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, राज्य सरकारकडून अवघ्या 2.50 लाखांत मिळणार घर

बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात उत्तर पत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. मात्र, बोर्डाने हस्ताक्षरातील मजकूर वगळून उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करत इतर विद्यार्थ्यांसोबतच या विद्यार्थ्यांचेही निकाल जाहीर केले.

आता उत्तरपत्रिका छेडछाड प्रकरणातील दोषींवर बोर्डाकडून फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३७२ उत्तर पत्रिकेतील अक्षर का कशासाठी आणि कोणी लिहायला लावली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. त्या शोधात संशयाची सुई ही थेट विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे या दोन शिक्षकांशिवाय अनेक लोक या प्रक्रियेत सहभागी असण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com