Climate Change Disaster : ज्वालामुखीचा भडका उडणार असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळे जगाचा लवकरच विनाश होणार आहे. तो कसा पाहूयात...या स्पेशल रिपोर्टमधून...
निसर्गाला न जुमानणाऱ्या मानवाला हवामान बदलामुळे भविष्यात वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावं लागणार आहे. त्यातल्याच एका संकटानं जगाचा विनाश होऊ शकतो...
जगभरात ज्वालामुखींचा उद्रेक होणार असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक् केलीय. त्याला कारण ठरलय वितळणारं ग्लेशिअर.. होय.. हवामान बदलामुळे ग्लेशिअर वितळतोय आणि त्यामुळे ग्लेशिअरजवळच्या ज्वालामुखींचा उद्रेक होऊ शकतो...यासंदर्भात शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन गोल्डश्मिट कॉन्फरन्स मध्ये सादर करण्यात आलयं. ग्लेशिअरवरच्या अभ्यासाअंती काय निष्कर्ष काढले आहेत पाहूयात..
ज्वालामुखींचा उद्रेक होणार ?
जगभरात ग्लेशिअरखाली 245 सक्रीय ज्वालामुखी
यात रशिया, न्यूझीलंड, उत्तर अमेरिका या क्षेत्रांचा समावेश
ग्लेशिअर ज्वालामुखींच्या उद्रेकाचे प्रमाण कमी करते
ग्लेशिअर वितळल्यामुळे ज्वालामुखींची क्रियाशीलता वाढणार
याआधीही 10 हजार वर्षांपूर्वी हिमयुगाच्या अंतावेळी ग्लेशिअर वितळल्यानं आइसलँडमधील ज्वालामुखींचा उद्रेक 30 ते 50 पटींनी वाढला होता. सातत्यानं ग्लेशिअर वितळत असल्यानं जगाची चिंता वाढलीय. दरम्यान भारतात ग्लेशिअरखाली सक्रीय ज्वालामुखी नसले तरी हिमालयात वितळणाऱ्या ग्लेशिअरमुळे भारताचीही चिंता वाढणार आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ होतेय. या घटनांसाठीही वायू प्रदुषण कारणीभूत ठरतय. त्यांमुळे मानवानं वेळीच निर्सगाचा ऱ्हास रोखला नाही तर या निसर्गाचा उद्रेकच मानवाच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.