Monkeypox
MonkeypoxSaam Tv

मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी नवीन RT-PCR किट, झटक्यात मिळणार रिपोर्ट

20 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची सुमारे 200 प्रकरणे नोंदवण्यात आली आहे.
Published on

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात एका नवीन विषाणूने संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवले आहे. या विषाणूचे नाव आहे मंकीपॉक्स. 20 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची सुमारे 200 प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. भारतात अद्याप मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यादरम्यान भारतातून एक चांगली बातमी समोर येत आहे. एका भारतीय खासगी आरोग्य कंपनीने मंकीपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी रियल-टाइम RT-PCR किट तयार केली आहे. या किटचा वापर करून रुग्णाला ऑर्थोपॉक्स विषाणू म्हणजेच मंकीपॉक्सची लक्षणे आहेत की नाही हे कळेल.

'ट्रिविट्रॉन हेल्थकेअर'ने शुक्रवारी मंकीपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी RT-PCR किट विकसित करण्याची घोषणा केली. याबाबद ट्रिविट्रॉन हेल्थकेअरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या संशोधन आणि विकास पथकाने मंकीपॉक्स विषाणू शोधण्यासाठी आरटी-पीसीआर आधारित किट विकसित केली आहे. ट्रिविट्रॉनचे मंकीपॉक्स रिअल-टाइम पीसीआर किट हे ४ रंगी फ्लूरोसेन्स आधारित किट आहे. ही किट एकाच ट्यूबमध्ये चेचक आणि मंकीपॉक्समध्ये फरक करू शकते. याचा अहवाल मिळण्यास एक तास लागणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

हे देखील पाहा -

अशा प्रकारे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग होतो;

मंकीपॉक्स विषाणू संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा त्याचे रक्त, शरीरातील द्रव किंवा फर यांना स्पर्श करून संक्रमित होऊ शकतो. हे उंदीर, ससे यांसारख्या प्राण्यांच्या चाव्याव्दारे पसरते असे मानले जाते. हा विषाणू माणसांमध्ये खूप वेगाने पसरतो. तुम्ही संक्रमित व्यक्तीचे कपडे वापरल्यास तुम्हाला मंकीपॉक्स होऊ शकतो. हा विषाणू शिंक आणि खोकल्यामुळे देखील पसरू शकतो.

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?

  • मंकीपॉक्सची लागण झाल्यापासून पाच दिवसांत ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यासारखी लक्षणे दिसून येतात.

  • मंकीपॉक्स सुरुवातीला चिकनपॉक्स, गोवर किंवा चेचक यांसारखा दिसतो.

  • ताप आल्यानंतर एक ते तीन दिवसांनी त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो.

  • शरीरावर पिंपल्स दिसतात.

  • हात, पाय, तळवे, पायाचे तळवे आणि चेहऱ्यावर लहान मुरुम दिसण्यास सुरुवात होते.

  • हे मुख्यतः चेहरा आणि हाताचे तळवे आणि पायांच्या तळवे यांना प्रभावित करते.

Monkeypox
लहान भावाची वहिनीवर वाईट नजर; मोठ्या भावला संपवलं, थरकाप उडवणारी घटना

मंकीपॉक्सचा उपचार

  • मंकीपॉक्सचा संशय असल्यास, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य नमुना गोळा करावा.

  • त्यानंतर नमुना सुरक्षितपणे प्रयोगशाळेत पोहोचला पाहिजे.

  • मंकीपॉक्सची पुष्टी नमुन्याचा प्रकार आणि गुणवत्ता आणि प्रयोगशाळा चाचणीच्या प्रकारावर अवलंबून असते.

  • मंकीपॉक्स नियंत्रित करण्यासाठी लसीकरणाचे मूल्यांकन करण्यासाठी अभ्यास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com