Dubai Building Fire Video : निवासी इमारतीत भीषण आग, गगनचुंबी 'मरीना' आगीच्या भक्ष्यस्थानी; नागरिकांमध्ये मोठी घबराट

Dubai Marina Building Fire : दुबईतील मरीना इमारतीला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोढे पाहायला मिळाले. इमारतीला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवरुन आगीच्या दाहकतेचे अंदाज येतो.
Dubai Building Fire Video
Dubai Building Fire Videox
Published On

Dubai News : दुबईमधील ६७ मजली मरीना इमारतीत भीषण आग लागली. ही आग जवळपास ६ तास तुफानपणे धुमसत राहिली. दुबई सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. दुबई मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर लगेचच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीत आग लागली, त्यातील एकूण ७६४ फ्लॅट्समधून ३८२० लोकांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासोबत वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवा तत्परतेने कार्यरत होत्या.

Dubai Building Fire Video
Kantara 2 : अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटाच्या सेटवर दोन महिन्यात तिसरा मृत्यू; सिनेसृष्टीत खळबळ

इमारतीला आग लागल्यानंतर शेजारील इमारतींना देखील आगीचा धोका निर्माण झाला होता. पण सावधगिरीने तत्काळ उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला. वेळेत आग विझवल्याने दुबई सिव्हिल डिफेन्सच्या जलद प्रतिसादाचे कौतुक केले जात आहे. आग कोणत्या कारणांमुळे लागली याचा तपास सुरु आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.

Dubai Building Fire Video
Pune Rain : पुण्यात पावसाचे रौद्ररुप! रस्त्यांना नदीचे स्वरुप, बाईकसह तरुण पावसाच्या पाण्यात वाहून गेला अन्...

सुरक्षेच्या कारणास्तव, दुबई मरीना स्टेशन क्रमांक ५ ते पाम जुमेरा स्टेशन क्रमांक ९ दरम्यानची ट्राम सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. रोड अँड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (RTA) ने प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी बस सेवा सुरू केली आहे. ट्राम सेवा केवळ संपूर्ण सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुन्हा सुरू करण्यात येईल.

Dubai Building Fire Video
Air India Plane Crash Video: विमान अपघाताचा पहिला व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाची चौकशी, मोठी माहिती समोर येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com