Blast In Military Plant: लष्कराच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, १९ जण जिवंत जळाले; बचावकार्य सुरू

Blast In Military Plant At America: अमेरिकेमध्ये लष्कराच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. शस्त्रसामग्री तयार करणाऱ्या या कारखान्यात ही घटना घडली. यामध्ये १९ जण जिवंत जळाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
Blast In Military Plant: लष्कराच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट,  १९ जण जिवंत जळाले; बचावकार्य सुरू
Blast In Military PlantSaam Tv
Published On

Summary -

  • टेनेसीतील लष्करी शस्त्रसामग्री कारखान्यात भीषण स्फोट झाला

  • या स्फोटात १९ जण जिवंत जळाले असून अनेक जण बेपत्ता झालेत

  • स्फोटाचे कारण अस्पष्ट असून तपास सुरू आहे

  • घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू आहे

अमेरिकेतील टेनेसी येथे लष्कराच्या शस्त्रसामग्री तयार करणाऱ्या प्लांट म्हणजेच कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटामध्ये १९ जण जिवंत जळाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज आसपासच्या गावापर्यंत ऐकू गेला. यामुळे घरांच्या भिंती हादरल्या, खिडक्यांच्या काचा फुटल्या.

हम्फ्रे काउंटी शेरीफ ख्रिस डेव्हिस म्हणाले की, 'माझ्या कारकिर्दीत मी पाहिलेले हे सर्वात भयानक दृश्य आहे. आमची टीम बचाव कार्य करत आहे आणि बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबियांशी बोलत आहे. ही एक अतिशय दुःखद आणि विनाशकारी घटना आहे.' या प्लांटमध्ये काम करणाऱ्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असून एकच आक्रोश केला.

Blast In Military Plant: लष्कराच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट,  १९ जण जिवंत जळाले; बचावकार्य सुरू
Cylinder Blast : मध्यरात्री हॉटेलमध्ये एकदम आगीचा भडका, २ सिलिंडरचा स्फोट, दुकाने जळून खाक, अंबाजोगाईत आगीचे तांडव

शेरीफ यांनी पुढे असेही सांगितले की, ढिगाऱ्याखालून अधिकृतपणे कोणतेही मृतदेह बाहेर काढण्यात आले नसले तरी स्फोटाची तीव्रता पाहता अधिकाऱ्यांना भीती आहे की अनेक जणांचा मृत्यू झाला असेल. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, स्फोटक पदार्थांची अयोग्य साठवणूक किंवा कारखान्यातील तांत्रिक बिघाडामुळे हा भीषण स्फोट झाला असावा. स्फोटाचा आवाज दूरवर असलेल्या गावांमध्ये ऐकू गेला त्यामुळे गावकरी प्रचंड घाबरले.

Blast In Military Plant: लष्कराच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट,  १९ जण जिवंत जळाले; बचावकार्य सुरू
Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी बचावकार्यात गुंतले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूचे परिसर रिकामे करण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही फर्त एक दुर्घटना नाही तर सर्वांना हादरवून टाकणारी एक दुर्घटना आहे. आमचे प्राधान्य आहे की सर्व बेपत्ता लोकांना शोधणे. स्फाटाचे कारण अस्पष्ट आहे. तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या तपासाला बरेच दिवस लागू शकतात.

Blast In Military Plant: लष्कराच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट,  १९ जण जिवंत जळाले; बचावकार्य सुरू
Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com