
दिल्ली-मुंबई हायवेवर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मनोहर लाल धाकडला पोलिसांनी अटक केली आहे. मध्यप्रदेशातील मंदसौर येथील भानपुरा पोलिसांनी कथित भाजपा नेता धाकडला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपी मनोहर लाल धाकडला तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी (२५ मे) चौकशीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध बीएनएस कलम २९६ आणि २८५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी जेव्हा मनोहर लाल धाकडला न्यायालयाबाहेर आणले, तेव्हा त्याच्या तोंडावर काळा कपडा टाकला होता. या कारवाईदरम्यानचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
भाजपचे कथित नेता मनोहर लाल धाकडचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ १३ मे च्या रात्रीचा असल्याचे म्हटले जात आहे. अश्लील कृत्य केल्यानंतर दोघांनी काहीवेळ रस्त्याच्या मधोमध नाच देखील केला होता. हायवेवर तैनात असलेल्या काही टोल कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ लीक करण्याची धाकडला धमकी दिली, त्याला ब्लॅकमेल केले. पण पैसे न दिल्याने टोल कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर लीक केला.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती एसपी अभिषेक आनंद यांनी दिली. 'मनोहर लाल धाकडची चौकशी केल्यानंतर त्याला अटक झाली आहे. पोलिसांनी टोल कंपनीकडून त्या दिवशी कामवर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ लीक केला, त्यांची चौकशी केली जाणार आहे. जर त्यांच्यावरील आरोप खरे आहे असे आढळले, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे', असे अभिषेक आनंद यांनी म्हटले आहे.
हायवेवरील आक्षेपार्ह आणि अश्लील कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केले. शामगड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष कमलेश जयस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ८ व्या लेनवर जाऊन गंगाजल शिंपडून हायवे शुद्ध केला. शुद्धीकरणासाठी गायत्री मंत्राचा जप देखील केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.