Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची 10 कामं; भारताची बलस्थानं, पाहा स्पेशल रिपोर्ट ,VIDEO

Manmohan Singh death : देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा सिंह आज परलोकाच्या प्रवासाला निघून गेला. परंतू याच मनमोहन सिंहांनी केलेली १० कामं आज देशाची बलस्थानं झाली ही नेमकी 10 कामं कोणती पाहूया.. या रिपोर्टमध्ये..
Manmohan Singh news
Manmohan Singh life changing storySaam Tv
Published On

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या भक्कम कामामुळे त्यांना भविष्यातील पिढ्या धन्यवाद म्हणतील याबद्दल शंका नाही. पाहुया देशाला भक्कम आणि आधार देणारी ती कामं.

आर्थिक उदारीकरण (1991)

आर्थिक उदारीकरणातून भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवत त्यांनी जगासाठी उदारीकरणाचे दरवाजेही उघडले

मनरेगा (2005)

महात्मा गांघी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेनं आज देशातील मजूरांना हक्काचा रोजगार मिळाला.

माहितीचा अधिकार (RTI) (2005)

भारतीयांना महितीचा अधिकार बहाल करुन देशात पारदर्शकता आणली

अणु करार (2008)

अमेरिकेसोबत मनमोहन सिंहांनी अणू करारासाठी आपली सत्ता पद पणाला लावलं.

आधार कार्ड योजना (2009)

ओळखपत्र म्हणून जे आधारकार्ड आपण खिशात ठेवतो ते मनमोहन सिंहांनी देशाला दिलंय.

Manmohan Singh news
Manmohan Singh Death: देशाने दुरदर्शी नेता गमावला...दिग्गज खेळाडूंनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

मोफत शिक्षेचा अधिकार (2009)

शिक्षणाचं महत्त्व ओळखून देशातील प्रत्येक बालकाला मोफत आणि अनिवार्य शिक्षेचा अधिकार दिला

भारताच्या आर्थिक विकासाची गती

देशाचा आर्थिक विकास हा मनमोहन सिंहांच्या कार्यकाळात गतीवान झाला, जीडीपी वाढीचा दर हा 8 % इतका होता

महिला आरक्षण आणि सशक्तीकरण

महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक मनमोहन सिंहांच्या कार्यकाळात मांडलं गेलं.

पंचायती राज आणि ग्रामीण विकास

ग्रामीण भागात आधारभूत सुविधा विकासासाठी भारत निर्माण योजना मनमोहन सिंहांनी सुरू केली.

Manmohan Singh news
Manmohan Singh: 'उत्कृष्ट पंतप्रधान गमावला', डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने कलाकार शोकाकूल

सामाजिक आणि आरोग्य सुधारणा

जननी सुरक्षा योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन सारख्या योजनांनी ग्रामिण आरोग्य सेवांमध्ये सुधारणा केली.

मनमोहन सिंह यांच्या आर्थिक नितीमुळे देशाची अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल झाले. भारताची महासत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली. भारताची आर्थिक स्थिती सुधारली. भारत जगाची महाशक्ती बनू शकतो हा विश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण करण्यात मनमोहन सिंह यशस्वी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com