Excise Policy Case: मनीष सिसोदिया यांच्या पत्नीची प्रकृती खालावली, LNJP रुग्णालयात दाखल

मनीष सिसोदिया घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीची प्रकृती खालावली.
Manish Sisodia News
Manish Sisodia NewsSaam tv
Published On

Manish Sisodiya News: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाने काही तासांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. कारण मनीष सिसोदिया घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीची प्रकृती खालावली. यानंतर त्यांना जवळच्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Manish Sisodia News
Edible Oil Price : महागाईत सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलच्या किमतीत होणार घट...

मनीष सिसोदिया यांची पत्नी सीमा सिसोदिया या मल्टीपल स्क्लेरोसिस या आजाराने त्रस्त आहेत. मनीषची पत्नी गेल्या 23 वर्षांपासून या आजाराशी झुंज देत आहे. सीमा यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारात रुग्णाच्या शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. 

त्याला चालायला आणि उठायला त्रास होतो. याआधी एप्रिल महिन्यातही मनीष सिसोदिया यांची पत्नी सीमा सिसोदिया आजारी होत्या आणि त्यादरम्यान सीमा सिसोदिया यांना अपोलो रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते.

Manish Sisodia News
Beed News: एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला; बंद दाराआड चर्चा सुरु

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) सध्या दिल्लीतील मद्य अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी तिहार तुरुंग अधीक्षकांना सिसोदिया यांना त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्याचे निर्देश दिले, जिथे त्यांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्याआधीच सिसोदिया यांच्या पत्नीची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com