Beed News: एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला; बंद दाराआड चर्चा सुरु

Beed News Today: एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला; राजकीय चर्चा कडे महाराष्ट्राचे लक्ष
Beed News
Beed NewsSaam Tv

Political News: आगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच आता राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.एकनाथ खडसे आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

Beed News
Sangli Crime News: सांगली हादरली! अल्पवयीन मुलीचं भररस्त्यात अपहरण, अत्याचार करत धारदार शस्त्राने वार

यावेळी रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे (Pankaja Munde) यांची देखील उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये नेमकी राजकीय काय चर्चा होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहेत. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतल. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, या भेटीआधी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, 'पंकजा मुंडे यांचं वक्तव्य वेदनादायी आहे, गोपीनाथ मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षासाठी आपलं आयुष्य दिलं आहे. (political news)

Beed News
Largest Railway Accident : रेल्वे अपघातात 800 जणांनी गमावले होते प्राण, 42 वर्षांपूर्वीचा आजवरचा सर्वात मोठा अपघात; नेमकं काय घडलं होतं?

पंकजा मुंडे यांची अशी अस्वस्थता असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजप पक्ष ज्यांनी वाढवला बहुजनांपर्यंत पोहोचला अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होत आहे, असा आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच. भाजप मोठा पक्ष आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे भाजप पक्ष सोडतील का, अशीही एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलं आहे. याचदरम्यान, एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com