Manipur Attack: मुलाच्या वाढदिवसादिवशी घरी येण्याचं वचन देणाऱ्या जवान बापाचं अतिरेकी हल्ल्यात निधन

मणिपूरमध्ये काल एक हृदयाद्रावक घटना घडली आहे.
Manipur Attack: मुलाच्या वाढदिवसादिवशी घरी येण्याचं वचन देणाऱ्या जवान बापाचं अतिरेकी हल्ल्यात निधन
Manipur Attack: मुलाच्या वाढदिवसादिवशी घरी येण्याचं वचन देणाऱ्या जवान बापाचं अतिरेकी हल्ल्यात निधनSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये Manipur काल एक हृदयाद्रावक घटना घडली आहे. आसाम रायफल्सचे Assam कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये भारताचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्नल विप्लम त्रिपाठी यांच्याबरोबर ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

यामध्ये आसाम रायफल्सचे जवान सुमन स्वारगिरी Suman Swargiay यांचा देखील समावेश यामध्ये आहे. स्वारगिरी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. या दुखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्वारगिरी पुढच्या महिन्यात आपल्या घरी येणार होते. त्यांच्या मुलाचा डिसेंबर महिन्यामध्ये तिसरा वाढदिवस होता. पण त्यांचा अशाप्रकारे अंत झाल्यामुळे कुटुंबासह नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.

हे देखील पहा-

हल्ल्याच्या घटनेच्या १ तास अगोदर स्वारगिरी यांची त्यांच्या पत्नीबरोबर फोनवर बातचित केली होती. या घटनेमुळे स्वारगिरी यांची पत्नी पूर्णपणे खचली आहे. तिचा आक्रोश बघून संपूर्ण गाव हळहळतं आहे. शहीद सुमन स्वारगिरी यांचे कुटुंब आसामच्या बक्सा जिल्ह्यामधील थेकेराकुची या गावी वास्तव्यास आहे. त्यांना हल्ल्याविषयी माहिती आज सकाळी देण्यात आली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांच्या घरात मोठी खळबळ उडाली होती.

घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाची बातमी ऐकल्यावर कुटुंबियांनी आक्रोश सुरु केला होता. सुमन यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली होती. स्थानिक माध्यमकर्मी सुमन यांच्या घरी दाखल झाले होते. यावेळी काही माध्यमकर्मींनी सुमन यांच्या पत्नी जुरी यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला होता. जुरी यांनी सांगितले की, सुमन ८ जुलै दिवशी घरी आले होते. यावेळी ते काही दिवस थांबले आणि परत १५ जुलै दिवशी आपले कर्तव्य बजावण्याकरिता निघून गेले होते. तसेच सुमन यांनी काही तासाअगोदर आपल्याशी फोनवर बातचित देखील करण्यात आली होती.

Manipur Attack: मुलाच्या वाढदिवसादिवशी घरी येण्याचं वचन देणाऱ्या जवान बापाचं अतिरेकी हल्ल्यात निधन
मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, एसटी कर्मचारी महिला पोलिसांच्या ताब्यात...(पहा व्हिडिओ)

त्यावेळेस त्यांनी मुलाच्या वाढदिवसाकरिता सुरु असलेल्या लगबगीविषयी विचारपूस केली होती. तसेच घरातील सर्वांच्या तब्येतीची चौकशी देखील त्यावेळी करण्यात आली होती, अशी माहिती जुरी यांनी दिली आहे. मी त्यांना सांगितले होते की डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा घरी येणार आहे, तेव्हा तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारणार आहे. मुलाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी घरी येणार आहे, असे त्यांनी मला वचन दिले होते. पण यानंतर फोन कट झाला. त्यांनी सांगितले की, ड्यूटीहून कॅम्पसकडे परत जात आहे, नंतर बोलेन. पण त्यानंतर त्यांचा फोनच आला नाही. जेव्हा फोन आला, तर तेव्हा समजले की, सुमन हे जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे सांगण्यात आले आणि जुरी यांनी हंबरडा फोडला होता. शहीद जवान सुमन स्वारगिरी हे २०११ साली सैन्यात भरती झाले होते. त्याअगोदर ४ वर्षांपूर्वी काही समाजकंटकांनी त्यांच्या पित्याची घरात घुसून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. ते स्थानिक पीस पार्टीचे सदस्य होते. पित्याच्या निधनानंतर सुमनच कुटुंबाचे हेच कर्ताधर्ता होते. पण त्यांचा अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com